Nandurbar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Crime News : चोरट्यांकडून १५ मोटरसायकलसह सहा मोबाईल जप्त; मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यात चोरी

Nandurbar News चोरट्यांकडून १५ मोटरसायकलसह सहा मोबाईल जप्त; मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यात चोरी

Rajesh Sonwane

सागर निकवडे 
नंदूरबार
 : नंदुरबार शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. सातत्याने होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या घटनानंतर पोलिसांनी (Police) छडा लावला आहे. यात (Nandurbar) पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक करत त्यांच्याकडून १५ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. (Maharashtra News)

नंदुरबार शहर पोलीस स्टेशनकाकूंना मोटरसायकल चोरट्यांच्या विरोधात विशेष मोहीम उघडण्यात आली होती. त्यानुसार मोटरसायकल चोरी करणारे आरोपी दिनेश वसावे आणि राहुल भिल हे दोघे नंदुरबार शहरात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली. यानंतर सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या पंधरा मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या असून या आरोपींनी नंदुरबार पोलीस स्टेशन सोबतच सारंगखेडा, शहादा, मसावद पोलीस स्टेशनच्या हद्दीतही मोटरसायकल चोरी केल्या आहेत. 

१० लाखाचा मुद्देमाल जप्त 

याशिवाय सीमावरती भागातील गुजरात आणि मध्यप्रदेशमधूनही आरोपी मोटरसायकल चोरी (Theft) करत असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपींकडून अजून मोटरसायकली हस्तगत होण्याची शक्यता पोलीसांकडून व्यक्त करण्यात आले. त्याचसोबत शहरातून चोरीस गेलेले सहा मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. एकूण या चोरट्यांकडून दहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून सदर गुन्ह्यांमध्ये त्यांच्यासोबत कोणाचा सहभाग आहे; याचा तपास पोलीस दलाच्यावतीने करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बी. आर. पाटील यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT