leopard 
महाराष्ट्र

थरारक..बहिणीकडे जाताना बिबट्याशी सामना; गुरगुरत जवळ आला अन्‌

थरारक..बहिणीकडे जाताना बिबट्याशी सामना; गुरगुरत जवळ आला अन्‌

साम टिव्ही ब्युरो

तळोदा (नंदुरबार) : मोरवड (ता. तळोदा) येथून धानोरा येथे बहिणीकडे जात असलेला भाऊ व त्याचा पुतण्या या दोघांचा रस्त्याच्या कडेला लपून असलेल्या बिबट्यासोबत सामना झाला. या वेळी भांबेरी उडाल्याने दोघेही मोटारसायकलवरून पडल्याने गंभीर जखमी झाले. (nandurbar-news-taloda-forest-aria-leopard-on-the-way-to-sister-The-grunt-came-closer)

तळोदा तालुका अनेक वर्षांपासून बिबट्यांसाठी नंदनवन ठरला आहे. रोज कोणत्यातरी गावशिवारात बिबट्याच्या पाऊलखुणा दिसत असतात. शनिवारी तळोदा येथे एका दुकानावर काम करणारे राहुल पाटील व त्यांचा पुतण्या दगा पाटील दोघेही मोरवडला आपल्या गावी पोचले. तेथून राहुल यांना धानोरा येथे बहिणीला भेटायला जायचे होते. त्यांनी पुतण्या दगा यालाही सोबत घेतले व दोघेही धानोऱ्याला जात होते.

बिबट्या गुरगुरत जवळ आला

उसाच्या शेताजवळ बिबट्या रस्त्यावर समोरच येऊन उभा ठाकल्याने दोघांची भंबेरी उडाली व दोघेही मोटारसायकलवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. बिबट्या दोघांच्या जवळ येत असतानाच, राहुल यांनी एक्सिलेटरद्वारे सायलेन्सरचा आवाज वाढवला. त्यामुळे बिबट्या आणखी जोरात गुरगुरत असल्याने दोघांनाही समोर साक्षात मृत्यू दिसत होता. मात्र दैव बलवत्तर म्हणून बिबट्या तेथून शेतात पसार झाला. त्यानंतर दोघांनी भ्रमणध्वनीद्वारे मित्रांना कळविल्यानंतर त्यांना तळोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वन विभागालाही याबाबत माहिती कळविण्यात आली. दरम्यान, वन विभागाने पंचनामे केले असले, तरी बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत असून, वन विभाग मात्र कुठेही पिंजरा लावावयास तयार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांच्या निधनानंतर CM देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय|VIDEO

Maharashtra Politics : तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीकडून निसटल्या? मुख्यमंत्री फडणवीस मांडणार अर्थसंकल्प

गुजरातला जास्त, महाराष्ट्राला कमी... महाराष्ट्राचे खासदार दिल्लीत भांडले पाहिजेत, अर्थ संकल्पावर बच्चू कडूंचा घणाघात

Monday Horoscope : अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, अन्यथा...; ५ राशींच्या लोकांना प्रगतीचा मार्ग गवसणार

Ladki Bahin Scheme: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार २१०० रुपये, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT