Nandurbar Rain News Saam tv
महाराष्ट्र

Surat Nagpur Highway: पूल दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर; अवजड वाहनांना अद्यापही प्रवेश बंदच

पूल दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर; अवजड वाहनांना अद्यापही प्रवेश बंदच

दिनू गावित

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील विसरवाडीजवळ अतिवृष्टीमुळे नदीवरील नागपूर– सुरत राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी पूल वाहून गेल्याने महामार्ग बंद झाला आहे. दरम्यान (Rain) पावसाचा जोर कमी झाल्याने महामार्गाच्या चौपदरीकरणाचे (Nandurbar news) काम करणाऱ्या जे. एम. म्हात्रे ठेकेदाराकडून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. (nandurbar news Surat Nagpur Highway bridge repair work)

पावसाच्या पुराने व वाहन चालकांनी अडथळा न दिल्यास लवकरात लवकर दुरुस्त करून देऊ अशी माहिती ठेकेदार जे. एम. म्हात्रे यांनी दिली आहे. जवळच्या खेडेगावातील (Farmer) शेतकरी बांधवांना बाजारपेठेत येण्यासाठी दुचाकीस्वार व लहान गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या पुलावरून जाऊ दिले जात आहे. मात्र (Accident) अपघात होऊ नये; यासाठी मालवाहू अवजड वाहनांना प्रवेश बंद केला आहे.

चुकीच्‍या माहितीने ट्राफिक जाम

नागपूर– सुरत राष्ट्रीय महामार्गाचे नवापूर तालुक्यात चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. विसरवाडी सरपणी नदीवर मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी पूल नदीमधून तयार केला होता. परंतु सरपणी नदीला आलेल्या महापुरामुळे कच्चा पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. नवापूर विधानसभेचे आमदार शिरीष नाईक यांनीही वाहतूक पूर्ववत व्हावी यासाठी पाहणी करून संबंधित ठेकेदाराला दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ठेकेदाराकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे. वाहन चालकांना रस्ता सुरू झाल्याची चुकीची माहिती मिळाल्याने मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाली आहे. महामार्ग कधी सुरू होईल; याकडे वाहनचालक टक लावून बसले आहे. मात्र पावसाचा जोर कायम राहिल्यास पुरामुळे दुरुस्तीसाठी मोठी अडचण येऊन जास्त कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live Update : आयोगाचा दावा अन् सिब्बल भडकले! 'त्या' अधिकृत शिक्क्यावरून सुप्रीम कोर्टात घमासान; पाहा काय घडलं

Maharashtra News Live Update : राज्यसभेत अमित शहांना बोलवा - मल्लिकार्जुन खर्गे

Beauty Tips : मानेवर चामखीळ किंवा तीळ घाण दिसतोय? या घरगुती उपायांनी करा कायमचा उपाय

Janhvi Kapoor: अश्लील फोटोप्रकरणी जान्हवी कपूरला हाय कोर्टाचा दिलासा; पण, फॅन पेजेस ब्लॉक करण्यास नकार

माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा मृत्यू?, पाकिस्तानच्या पत्रकाराचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT