Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar : नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात दगडफेक प्रकरण; आरोपी पकडण्यासाठी गुजरात व मध्यप्रदेश पोलिसांची मदत

Nandurbar News : आदिवासी तरुणाच्या हत्येच्या घटनेनंतर जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता. यानंतर काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झाले होते. यातील आरोपीना पकडण्यासाठी गुजरात आणि मध्यप्रदेश पोलिसांची मदत

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार शहरात एका आदिवासी तरुणाची किरकोळ वादातून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेचा निषेध म्हणून आदिवासी समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हिंसक वळण लागल्यानंतर आता पोलिसांनी आरोपींच्या पकडीसाठी एक विशेष मोहीम सुरु केली असून यासाठी गुजरात व मध्यप्रदेश पोलिसांची मदत घेतली जात आहे. 

नंदुरबार शहरात मागील आठवड्यात एका आदिवासी तरुणाची किरकोळ वादातून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने आदिवासी समाज बांधव आक्रमक झाला होता. घटनेचा निषेध म्हणून नंदुरबार जिल्हा बंद पुकारण्यात आला होता. तर आरोपीला पकडून शिक्षा व्हावी; तसेच घटनेच्या निषेधार्थ आदिवसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मूक मोर्चा काढण्यात आला होता.  

दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा पोहल्यानंतर या मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झाले होते. यावेळी पोलिसांवर देखील दगड फेक झाली होती. तर पोलिसांनी गुन्हा दाखल करत काही जणांना ताब्यात घेतले होते. आता पोलिसांनी आरोपींच्या पकडीसाठी एक विशेष मोहीम सुरू केले आहे. आता पर्यंत १४० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या मूक मोर्चामध्ये शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश मधील आंदोलन सहभागी झाले होते.  

टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज घेतले हाती 

मोर्चातील आंदोलकांची ओळख पटवण्यासाठी शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश पोलिसांची मदत नंदुरबार पोलीस घेणार आहेत. त्या सोबत सीमावर्ती भागात असलेल्या टोल नाक्यांवरती सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेण्यात आले आहेत. या ठिकाणी कोणत्या वाहनातून आंदोलन आले होते. याचाही तपास पोलीस करत आहे. एकूणच नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हिंसेच्या घटनेनंतर विशेष तपास पथक तयार केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केसगळती कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल हर्बल हेअर ऑइल, कधी आणि कसं लावायचं? जाणून घ्या

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या! MACP योजनेचे नियम बदलले; 'या' कर्मचाऱ्यांना आता एक रुपयाही मिळणार नाही

Heart Attack : BP नॉर्मल असतानाही येतो हार्ट अटॅक, 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष करणे पडते महागात

Farmers Protest : मुगाला १०० टक्के हमीभाव, हजारो शेतकरी आक्रमक; ७ दिवसांचं अन्न-पाणी घेऊन ठिय्या, शाळांना सुट्टी

Belly fat: पोटाच्या कोणत्या भागावर चरबी साचतेय? तज्ज्ञांनी सांगितलं कोणत्या गंभीर आजारांचा असू शकतो हा मोठा इशारा

SCROLL FOR NEXT