Nandurbar Mahavikas Aaghadi Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता; खडसेंचे निकटवर्तीय जाणार भाजपात?

Nandurbar News : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे भाजपात जात असल्याने याच्या परिणाम महाविकास आघाडीवर होणार असून, नंदुरबार जिल्हा देखील खडसे यांना मानणारा मोठा गट आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : राज्यातील महाविकास आघाडीतील काही वरिष्ठ नेते पक्ष सोडून जात आहेत. यानंतर आता नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) देखील फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार उदेसिंग पाडवी हे आज महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असताना त्यांनी तसे सूचक विधान केले आहे.  (Maharashtra News)

नंदुरबार (Nandurbar) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उदेसिंग पाडवी हे एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय आहेत. दरम्यान एकनाथ खडसे (eknath Khadse) हे भाजपात जाणार असल्याने उदेसिंग पाडवी देखील भाजपा जातील का? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे (BJP) भाजपात जात असल्याने याच्या परिणाम महाविकास आघाडीवर होणार असून, नंदुरबार जिल्हा देखील खडसे यांना मानणारा मोठा गट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांना मानणारा वर्ग देखील भाजपात घरवापसी करणार; अशी शक्यता आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय म्हणाले पाडवी 

एकनाथ खडसे पंधरा दिवसानंतर भाजपात जातील. परंतु त्याआधी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. एकनाथ खडसे आम्हाला ज्यावेळेस बोलतील आणि आमच्या समोर त्यांची भूमिका मांडतील. त्यावेळेस आम्ही विचार करू, असं विधान माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी केले आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीत पुन्हा फूट पडणार का अशी देखील चर्चा रंगली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाच्या आमदाराला राधाकृष्ण विखे पाटील यांची महायुतीत येण्याची खुली ऑफर

सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का! खासदार विशाल पाटलांच्या कट्टर समर्थकांचा भाजपात प्रवेश

New Income Tax Bill: नवीन इन्कम टॅक्स बिल मंजूर, करदात्यांसाठी केले महत्त्वाचे बदल, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Success Story: 12वी फेल, २ वर्षे दूध विकले, मोठ्या जिद्दीने केली UPSC क्रॅक; नाशिकच्या लेकाची यशोगाथा

Asim Munir : ट्रम्पच्या कुबड्यांवर मुनीरच्या बेडूक उड्या;पाकचा हिटलर अमेरिकेत बरळला, VIDEO

SCROLL FOR NEXT