Nandurbar Saam Impact News Saam tv
महाराष्ट्र

Saam Impact News: बीड जिल्ह्यात अडकलले मजुर धडगावी परतले; मजुरांचे कामाचे पैसेही मिळाले परत

बीड जिल्ह्यात अडकलले मजुर धडगावी परतले; मजुरांचे कामाचे पैसेही मिळाले परत

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : धडगाव तालुक्यातील राडीकलम, घाटली, खामला, बोदला, मांडवी, वलवाल आणि सोन बुद्रुक येथील रहिवासी असलेल्या ४० कामगार बीड (Beed) जिल्‍ह्यात अडकले होते. याबाबत ‘साम टीव्‍ही’ने लावलेल्‍या बातमीनंतर या सर्व मजुरांना त्‍यांच्‍या मजूरीचे पैसे मिळून त्‍यांची सुटका झाली. यानंतर ते धडगाव (Nandurbar News) येथे परतले आहेत. (Latest Marathi News)

बीड जिल्ह्यातील येथील वाघोरा (ता.माझलगाव) येथे एका खाजगी प्रोडक्ट आणि ओईल कंपनीच्या ठेकेदारांकडे धडगाव तालुक्‍यातील काही मजूर कामासाठी गेले होते. ठेकेदाराकडे ठरल्याप्रमाणे मजुरांना मजुरी न देता कमी मजुरी आणि दैनंदिन हजेरी कमी दाखवून, दोन शिप्टच्या ड्युटीची नोंद न करता मजुरांची पिळवणूक करत असल्याचा प्रकार समोर आला. ठरल्याप्रमाणे मजुरी मिळावी व तेथून सुटका व्हावी. यासाठी मजूर तालुका प्रशासनाला विनंती करत असल्याचा व्हिडियो (Saam Impact) साम टिव्ही ला मिळाला होता. त्यानंतर आदिवासी जनजागृतीने टीम त्याचा प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करत आलेल्या व्हिडीओच्या आधारे बातमी प्रसारित केली.

प्रशासनाच्या मदतीने मजुरांची सुटका करण्यात यश मिळाले असून २४ तासाचा प्रवास करत सर्व मजूर धडगाव येथे आपआपल्या घरी सुखरूप पोहचले. अडकलेल्या मजुरांमध्ये लहान बालके, महिला आणि पुरुष मिळून एकूण २९ नागरिकांची सुटका झाली. उर्वरित मजुरांचे मजुरी लवकरच देणार असून त्याकरिता ७ मजूर वाघोरा येथे थांबले असल्याची माहिती पिडीत मजूर दिनेश पावरा यांनी माहिती दिली. सदर मजुरांची सुटका करण्यासाठी आदिवासी जनजागृतीसह तालुका प्रशासनाने अक्राणी तालुक्याचे तहसीलदार के. एन. गावित यांनी सहकार्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपर फूट प्रकरण, १६ संशयित आरोपी तपास यंत्रणांच्या ताब्यात

PM मोदी म्हणाले पेट्रोल-डिझेलची बचत करा; पण देशात किती दिवस पुरेल इतका साठा? सरकारची अधिकृत आकडेवारी

आधी बायकोच्या बॉयफ्रेंडची हत्या केली, नंतर प्रायव्हेट पार्ट जाळला; विवाहबाह्य संबंधामुळे नवऱ्याचं हादरवणारं कृत्य

Gold Rate Today: सोनं ₹१५०० तर चांदी १० हजारांनी महागली; सुवर्णनगरीतील १ तोळ्याचे दर किती? वाचा सविस्तर

Old Clothes Reuse Ideas: टाकाऊपासून टिकाऊ! जुन्या जीन्स आणि टी- शर्टपासून घरच्या घरी बनवा स्टायलिश बॅग्स

SCROLL FOR NEXT