Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी नंदुरबारमध्ये तुफान गर्दी

Nandurbar News : राज्य सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली असून आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. यासाठी १५ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली आहे. यामुळे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी व अर्ज भरण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी होत आहे. नंदुरबारमध्ये हे चित्र पाहण्यास मिळत असून अनेक ठिकाणी ढकलाढकलीचे प्रकार झाल्याचे पाहण्यास मिळाले.  

राज्य सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली असून आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने नंदुरबार शहरातील महिलांनी फॉर्म भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून येत आहे. लाडकी बहीण या योजनेत महिलेला महिन्याला पंधराशे रुपये मिळणार असल्याने महिला ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दिसून येत आहे. नंदुरबार शहरातील सायबर कॅफेवर महिला यांनी अर्ज भरण्यासाठी आणि अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवा जुळत करताना दिसून येत आहे.

उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठीही गर्दी 

योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. यामुळे अर्ज भरण्यापूर्वी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी देखील तशीच गर्दी होत आहे. तलाठी कार्यालय व तहसील कार्यालयात महिलांसह पुरुषांची देखील गर्दी झालेली पाहण्यास मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT