Navapur News Saam tv
महाराष्ट्र

Navapur News : रस्त्याचे काम केवळ कागदावर; काम सुरु केले नसताना दाखविले ६१ टक्के काम, ठेकेदाराने काढले ४१ लाख रुपये

Nandurbar News : सहा महिने उलटल्यानंतर देखील रस्त्याच्या कामाला सुरुवात नाही. ठेकेदारांनी रस्त्याचे काम ६१ टक्के पूर्ण झाले असून तीन कोटी रुपये खर्च दाखवून शासनाकडून ४१ लाख काढून घेतले

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील नागझरी- धनबर्डी- खोखो या परिसराला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामामध्ये मोठा भ्रष्ट्राचार झाल्याचे समोर आले आहे. कारण प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला सुरवात न करता कागदावर ६१ टक्के काम झाल्याचे दाखवून ४१ लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात हा प्रकार समोर आला आहे. नागझरी- धनबर्डी- खोखो परिसराला जोडणाऱ्या या रस्त्यासाठी ४ कोटी ८५ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र सहा महिने उलटल्यानंतर देखील या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. याच्यात अजब किस्सा म्हणजे ठेकेदारांनी या रस्त्याचे काम ६१ टक्के पूर्ण झाले असून तीन कोटी रुपये खर्च दाखवून शासनाकडून ४१ लाख काढून घेतले आहे. मात्र संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी रस्त्याची कुठलीही पाहणी न करता बिल अदा कसं केले; असा प्रश्न गावकरी उपस्थित करत आहेत. 

कामासाठी अडीच कोटी रुपयांची मागणी 

इतकेच नाही तर ठेकेदाराने काम प्रगतीपथावर असून पुढील कामासाठी २ कोटी ५८ लाखाच्या निधीची मागणी देखील शासनाकडून केली आहे. तालुक्यात हा एकमेव रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाले असं नाही, तर आदिवासी विकास विभागांतर्गत अनेक कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच प्रशासनाच्या नाकाखाली इतका मोठा भ्रष्टाचार प्रशासनाच्या माहिती शिवाय शक्य आहे का? असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. 

कारवाईची मागणी 

दरम्यान शासनाने या रस्त्यांच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. तसेच प्रशासनात बसलेले भ्रष्टाचारी अधिकारी यांच्यावर देखील कडक कारवाई करावी; अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले असून अजून पर्यंत ग्रामस्थांची व्यथा ऐकण्यासाठी कुठलेही प्रशासनिक अधिकारी पोहोचले नसून यावर साम टीव्हीला प्रतिक्रिया देण्यासाठी देखील अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Global Economic Crisis : युद्धाची धग, घरोघरी पेटणार वणवा; जगात मंदी येणार?

मराठीची रचना जैनांनी केली, मुंबईत जैन विद्यापीठ हवे - जैन मुनी

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारेंचे आरोप धादांत खोटे; तक्रार असल्यास मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत - दीपक साळुंखे

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

SCROLL FOR NEXT