Nandurbar Saam tv
महाराष्ट्र

महसूल कर्मचारी बेमुदत उपोषणावर; जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

महसूल कर्मचारी बेमुदत उपोषणावर; जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या कर्मचारींपाठोपाठ महसूल कर्मचाऱ्यांचे हे बेमुदत उपोषण आहे. (nandurbar news Revenue employees on indefinite hunger strike)

राज्य शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या (Nandurbar News) मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा महसूल कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यावेळी उपस्थित महसूल कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

अशा आहेत मागण्या

गेल्या दोन वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नतीच्या फाइल्स शासनाने लवकर मार्गी लावाव्यात, नायब तहसीलदार पदावर पदोन्नती झालेल्या कर्मचार्‍यांवर अन्यायकारक स्टेट केडर लावलेला निर्णय मागे घ्यावा, सरळ सेवा भरतीचे प्रमाण 33 टक्के वरून 20 टक्के करावे, महाराष्ट्रातील प्रलंबित महसूल सहाय्यकाची रिक्त पदे त्वरित भरावीत. अशा प्रमुख मागण्यांसाठी नंदुरबार जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आ.भरत गोगावले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

First Shravan Monday 2026 : श्रावणातील पहिला सोमवार कधी? पूजा कशी करावी आणि कोणती शिवमूठ वाहावी?

अमृता खानविलकरचा हटके अंदाज, स्कर्ट-टॉपमध्ये खुलून आलं सौंदर्य

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेसेनेला मोठं खिंडार, शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Monsoon Health Care : सावधान! पावसाळ्यात फ्रिजमध्ये अन्न ठेवूनही ते खराब का होतंय? जाणून घ्या खरं कारण

SCROLL FOR NEXT