Nandurbar News Child Marriage Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: बालविवाह होण्यापूर्वीच पोलीस पोहोचले लग्न मंडपात

बालविवाह होण्यापूर्वीच पोलीस पोहोचले लग्न मंडपात

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : सिसा पाडली (ता. धडगाव) येथील बालविवाह ३० मे २०२३ रोजी होणार होता. त्यापूर्वीच ऑपरेशन अक्षताच्या (Nandurbar) पथकाला माहिती मिळाली. त्यांनी लग्न लागण्यापूर्वीच मंडपात जात बालविवाह (Child Marriage) थांबविला. दोन्ही कडील पालकांचे समुपदेशन करून त्यांना सज्ञान झाल्‍यावरच मुलगा-मुलीचा विवाह करण्याचा सल्ला दिला. (Latest Marathi News)

एका नागरिकाने फोनकरुन धडगांव पोलीस ठाणे हद्दीतील सिसा पाडली गावात ३० मे रोजी एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्‍याची माहिती दिली. सदर घटनेची माहिती धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना कळविली. यानंतर धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांनी अक्षता सेलच्या सदस्यांच्या मदतीने माहिती काढली असता सिसा पाडली गावातील अल्पवयीन मुलीचा विवाह (Marriage) गावातीलच तरुणासोबत ३० मे रोजी सायंकाळी होणार होता.

दोन्‍ही कुटुंबांना नोटीस

धडगांव पोलीस ठाण्याच्‍या पथकाने मुलीच्या घरी जावून अल्पवयीन मुलगी, वर मुलगा, त्यांचे कुटुंबीयांचे व गावातील नागरिक यांना कायदेशीर बाबी समजावून सांगून त्यांचे समुपदेशन केले. अल्पवयीन मुलीच्या व वर मुलाच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली. तसेच अल्पवयीन मुलगी व वर मुलाच्या पालकांना धडगांव पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup final : वर्ल्डकप फायनलवेळी राडा, भारताची विकेट पडल्यामुळे वाद, १७ वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या

Maharashtra Live News Update : देशात इंधनाचा तुटवडा नाही, HPCL कंपनीकडून मेसेज

Mumbai : मुंबईत क्रिप्टो स्कीमचा भंडाफोड; तब्बल ६.५० कोटी लुबाडले, मास्टरमाइंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Health Care : अंगदुखीची कारणे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

Divyang Kalyan Yojana: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांग व्यक्तींना मिळणार १५,००० रुपये

SCROLL FOR NEXT