Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदूरबार शहरातील हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nandurbar News : गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या नंतर पोलिसांनी धाड टाकली असता या ठिकाणी अनेक जण हुक्का पीत असल्याचे आढळून आले.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार शहरात एका दुकानात सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलीस अधीक्षक श्रवण एस दत्त यांनी धाड टाकत कारवाई केलिओ आहे. हुक्का पार्लरवर कारवाईची शहरातील पहिलीच घटना असल्याचे खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलिसांनी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नंदुरबार (Nandurbar News) शहरात कोरेट नाका परिसरात एका दुकानात गुप्तपणे हुक्का पार्लर सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या नंतर पोलिसांनी धाड टाकली असता या ठिकाणी अनेक जण हुक्का पीत असल्याचे आढळून आले. यातच पोलिसांना बघून अनेक जणांनी तेथून पळ काढला. पोलिसांच्या कारवाई हुक्का पिण्यासाठी लागणारे तंबाखू, कोळसा यासोबतच इतर साहित्य (Nandurbar Police) पोलिसांनी जप्त केले असून एकूण ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  

१२ जणांवर गुन्हा दाखल 

यानंतर पोलिसांनी येथे असलेल्या १२ जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सोबतच या हुक्का पार्लरवर दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात अशा अनेक हुक्का पार्लर आणि गांजाचे प्रमाण वाढत असल्याची कुजबुज अनेक दिवसांपासून जिल्ह्यात होत आहे. मात्र या कारवाईने आता समाधान व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: नाशिक शहरात सकाळपासून पावसाने घेतली विश्रांती

Lung Cancer Stage 1: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या स्टेज 1 मध्ये ही 5 लक्षणं दिसून येतात; शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखा

School Closed : शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

Hingoli Accident: महामार्गावर भयंकर अपघात! खड्ड्यात कार आदळून उलटली, २ तरुणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT