Shahada News Saam tv
महाराष्ट्र

Shahada News : पाच महिन्यांपासून रेशन मिळेना; ग्रामस्थ आक्रमक, तहसील कार्यालयावर महिलांची धडक

Nandurbar Shahada News : ग्रामस्थांच्या आरोपांनंतर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे. रेशन वाटपातील अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : रेशन धान्य दुकानातून गरिबांना धान्य देण्यात येत असते. मात्र मागील चार ते पाच महिन्यांपासून रेशन धान्य मिळत नाही. यामुळे महिला आक्रमक झाले आहेत. यामुळे संतप्त महिलांनी आज शहादा तहसील कार्यालयात धडक मोर्चा काढण्यात आला. तर रेशन धान्य दुकानदार मनमानी कारभार करून लाभ देत नसल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील श्रीखेड गावातील रेशन लाभार्थी महिलांनी हा मोर्चा काढला आहे. दरम्यान येथील रेशन दुकानदार धान्य वाटपात अनियमितता करत असल्याचा आरोप करत संतप्त गावकऱ्यांनी थेट तहसील कार्यालयात धाव घेतली. दुकानदार मनमानी कारभार करत असून, गेल्या तीन ते पाच महिन्यांपासून धान्य देत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

पूर्ण धान्य दिले जात नसल्याचा आरोप 
श्रीखेड येथील रेशन दुकानदार लाभार्थ्यांना अनेक महिन्यांपासून धान्य देत नाही. ज्यांना दिले त्यांनाही युनिटनुसार पूर्ण धान्य दिले जात नाही; असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावात दोनशेहून अधिक कार्ड धारक असतानाही दुकानदार महिन्यातून फक्त एकाच दिवशी रेशन वाटप करतो. यामुळे महिलांना पहाटे ४ वाजेपासून रांगेत उभे राहावे लागते. या मनमानी कारभाराला कंटाळून गावातील महिला व पुरुष यांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयात निवेदन दिले.

परवाना रद्दची मागणी 
दरम्यान नियमित धान्य मिळत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले असून गावकऱ्यांनी प्रशासनाकडे रेशन दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, श्रीखेड गावाचे रेशन दुकान जवळच्या कुरंगी येथील रेशन दुकानाला जोडण्यात यावे; अशी मागणीही त्यांनी केली. यामुळे गावातील नागरिकांना योग्य आणि वेळेवर धान्य मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरात सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

लग्नासाठी १४ कोटींचा पॅलेस बुक; होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवशी ट्रेकिंगला गेलेल्या बिल्डरच्या मुलाचा मृत्यू, लोहगडावर नेमकं काय झालं?

PM Kisan Yojana : शेतकऱ्याच्या खात्यावर किती वाजता जमा होणार ₹२०००? पीएम किसान योजनेची महत्त्वाची अपडेट आली समोर

पुण्यात रक्तरंजित थरार; नराधमाने 'लिव्ह-इन पार्टनर'च्या ३ वर्षीय मुलाला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण समोर

Haunted Fort : भारतातील ५ सर्वात भयानक अन् रहस्यमय किल्ले, सूर्यास्तानंतर येथे जाण्याची कोणी हिंमतच करत नाही

SCROLL FOR NEXT