Navapur saam tv
महाराष्ट्र

नवापूरमध्‍ये दोन हजार जणांना उपलब्ध होणार रोजगार; पाचशे कोटींची होतेय गुंतवणूक

नवापूरमध्‍ये दोन हजार जणांना उपलब्ध होणार रोजगार..

दिनू गावित

नंदूरबार : जिल्ह्यातील नवापूर औद्योगिक परिसरात उद्योग उभारण्यासाठी पॉलीफिल्म प्रा. लि. कंपनीने पुढाकार घेतला असून सुमारे पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची कंपनीने तयारी दर्शविली आहे. याद्वारे आदिवासी भागात सुमारे दोन हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. (nandurbar news Navapur will provide employment to two thousand people)

नवापूर (Navapur) औद्योगिक परिसरात येणाऱ्या कंपन्यांना या कंपनीला सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने (MIDC) केली आहे. दरम्यान, लगतच्या सुरत (Surat) परिसरातील अनेक उद्योगांनी नवापूर येथे उद्योग विस्तार करण्यात स्वारस्य दाखविले आहे. याबाबत महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ संचालकांच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

आदिवासी बांधवांना रोजगार

महाराष्ट्र आणि गुजरात (Gujrat) राज्याच्या सीमेवर असलेल्या नवापूर तालुक्यात औद्योगिक परिक्षेत्रात मोठे उद्योग आल्यास येथील आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात औद्योगिक परिक्षेत्रात कमी गुंतवणूकिमुळे रोजगाराच्या संधी कमी असल्याने येथील नागरिकांना रोजगारासाठी परराज्यात जावे लागते. परंतु, या नवीन उद्योगामुळे रोजगारासाठी बाहेर जावे लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate: खरेदीची सुवर्णसंधी! आठवडाभरात सोनं ७००० तर चांदी १४००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Lemon storage tips: लिंबू सुकू नयेत म्हणून ‘या’ पद्धतीने करा स्टोअर, महिनाभर राहतील फ्रेश

Maharashtra News Live Update: ‘मुलुंडचा आमदार चोरीला गेला’; काँग्रेसचे राकेश शेट्टी यांची पोलिसांत तक्रार

New Rule : 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम! ATM ते LPG पर्यंत 5 नवे नियम लागू, वाचा सविस्तर

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

SCROLL FOR NEXT