Bribe Navapur News Saam tv
महाराष्ट्र

Navapur News: चेकनाक्यावर पाचशेची लाच घेताना पकडले; कागदपत्र ओके असतानाही पैशांची मागणी

चेकनाक्यावर पाचशेची लाच घेताना पकडले; कागदपत्र ओके असतानाही पैशांची मागणी

साम टिव्ही ब्युरो

नवापूर (नंदुरबार) : वाहन व चालकाची सर्व कागदपत्रे असतानाही सीमा तपासणी नाक्यावर गुजरातहून (Gujrat) महाराष्ट्रात प्रवेशासाठी अनावश्यक पैशाची मागणी केल्याने (Nashik) नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. पाचशे रुपयांची (Bribe) लाच घेताना पंटरला पकडले. (Tajya Batmya)

पंटरला लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्यामुळे मोटार वाहन निरीक्षकांनाही दोषी धरले. याबाबत नवापूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पंटरचे नाव विजय मगण मावची (वय ४०) असे असून मोटार वाहन निरीक्षक महेश हिरालाल काळे (३८, रा. नाशिक) यांनी पंटरला लाच घेण्यासाठी प्रोत्साहित केले.

तक्रारदार ट्रकचालक गुजरातमधून राज्याच्या हद्दीत ट्रकसह प्रवेश करत असताना नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील खासगी पंटर विजय मावची याने सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतानाही तक्रारदाराकडे ५०० रुपयांची मागणी करून तिचा स्वीकार केला. मोटार वाहन निरीक्षक महेश काळे यांनी विजय मावची यास लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिले म्हणून त्यांच्याविरुद्ध नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सापळा अधिकारी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक साधना इंगळे यांच्या पथकात हवालदार प्रफुल्ल माळी, प्रकाश डोंगरे यांनी ही कारवाई केली. दरम्यान, नवापूर पोलिसांनी मात्र सायंकाळी सातपर्यंत गुन्हा दाखल करण्यासाठी कुणीही आलेले नाही, असे सांगितले. दरम्यान, येथील तपासणी नाक्यावर आजपर्यंत अनेक कारवाया झाल्या आहेत. मोटार वाहन निरीक्षकाची जबाबदारी असताना खासगी व्यक्ती पंटरला पुढे करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यामुळे यात कुणाला वाचविण्यासाठी प्रयत्न होतात, हे उघड गुपित राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'टिकली' ड्रग्जचा विद्यार्थ्यांना विळखा, नागपूरच्या कॉलेजेसमध्ये 'LSD'चा धुमाकूळ

वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद पेटला, राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाईफेक

सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भरधाव वाहनाने दिली धडक

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT