MSRTC Bus Saam tv
महाराष्ट्र

लालपरीचे स्टेरिंग पुन्हा हाती; ५०५ पैकी ४२८ कर्मचारी हजर

लालपरीचे स्टेरिंग पुन्हा हाती; ५०५ पैकी ४२८ कर्मचारी हजर

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : दोन दिवसात अडीचशेवर कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. तर त्यापूर्वी दिडशे कर्मचारी असे एकूण ५०५ पैकी ४२८ कर्मचारी हजर झाले. त्यामुळे आजपासून लालपरी रूळावर आली असून, दिवसभरात २९४ फेऱ्या नंदुरबार (Nandurbar) आगारातून एसटीने पूर्ण केल्या आहेत. येत्या दोन दिवसात ग्रामीण भागातील लोकल फेऱ्यांचेही नियोजन होऊन गाव तेथे एसटी पुन्हा पोहोचणार आहे. (nandurbar news msrtc bus steering wheel again 428 out of 505 employees join duty)

सहा महिन्याचा संप कालावधीनंतर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २२ एप्रिलपर्यंत एसटी कर्मचारींनी कामावर हजर राहणे बंधनकारक आहे. त्या आदेशाचे पालन करीत विलिनीकरणाचा लढ्यात सहा महिने सहभागी झालेले कर्मचारी शेवटी नोकरी गमावण्याच्या धाकाने हजर होऊन लागले आहेत. नंदुरबार आगारात सुमारे ५८७ कर्मचारी आहेत. त्यापैकी २७ जणांना निलंबित केले आहे. तेही अपिलात गेले आहेत. त्यांचाही निकाल लवकरच लागून त्यांना कामावर घेण्याचे आदेश प्राप्त होतील, पंधरा दिवसात त्यांनाही कामावर हजर राहता येण्याची शक्यता आहे. तसेच काही जण परजिल्ह्यातील आहेत तेही येत्या दोन दिवसात हजर होतील तर यापूर्वी दीडशे कर्मचारी सेवेत हजर झाले होते.

लांबपल्‍ल्‍याच्‍या फेऱ्याही सुरू

कालपासून उर्वरित सुमारे अडीचशेवर कर्मचारी सेवेत पुन्हा हजर झाले आहेत. निलंबित वगळता ५०५ कर्मचारी पैकी ४२८ कर्मचारी आजअखेर हजर झाले आहेत. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर रात्रीपासून त्यांनी एसटीची स्टेरिंग हाती घेत आपल्या सेवेला सुरवात केली आहे. आज पहिल्या दिवशी लांब पल्ल्याचा (Nashik) नाशिक, मुंबई, पुणे, जळगाव, धुळे, औरंगाबाद यासह तालुकास्तरावरच्या बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यात गाड्यांची उपलब्धता, त्यांची स्थिती, डिझेल उपलब्धता या सर्व तांत्रिक व प्रशासकीय बाबींचा विचार करून २९४ फेऱ्या नंदुरबार आगारातून एसटीने मारल्या आहेत. त्यामुळे आज रस्त्यावर लालपरी पुन्हा जोमाने धावताना दिसली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ? वाचा

Ukadiche Modak Recipe : सारण भरल्यावर उकडीचे मोदक फुटतात? मग 'ही' रेसिपी एकदा फॉलो कराच

Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच दिवशी सदस्यांची झोप उडाली; बिग बॉसच्या घराचं दार बंद, कोणता टास्क रंगणार?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार ₹३०००; सरकारने उचललं मोठं पाऊल

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT