MSEDCL 
महाराष्ट्र

महावितरण कर्मचाऱ्यांना डांबून ठेवणे पडले महागात; शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

महावितरण कर्मचाऱ्यांना डांबून ठेवणे पडले महागात; शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

दिनू गावित

नंदुरबार : वसुलीसाठी गेलेल्‍या कर्मचारींना कार्यालयात बोलावत खोंडामळी उपविभागाच्या अधिकारी जागृती साळुंखे पथकासह दाखल झाल्या. दीड तास भालेर येथे चर्चेअंती योग्य तोडगा न निघाल्याने वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या पाच ते सहा कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप करीत तालुका पोलिस ठाण्यात शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा शेतकऱ्यांनी निषेध करत तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. (nandurbar-news-MSEDCL-employees-have-to-pay-dearly-Crimes-filed-against-farmers)

नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील भालेर, तीसी, नगाव या गावांमध्ये जवळपास २४ ट्रान्सफॉर्मर आहेत. या परिसरात शेतकऱ्यांची (Farmer) मोठ्या प्रमाणावर वीज बिल थकल्याने महावितरणकडून गेल्या दोन दिवसांपासून वीज कनेक्शन खंडित करून विज बिल वसुली करत आहेत. परंतु वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या (MSEDCL) कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी चर्चेसाठी भालेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलवा. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी चर्चेसाठी येत नाही; तोपर्यंत कर्मचाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता.

वीज बिल भरण्याची सक्‍ती

नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी उपविभागांतर्गत शेकडो शेतकऱ्यांचे वीज बील थकले आहे. महावितरणकडून मात्र वीज बील भरण्याची सक्ती करण्यात येत आहे. चालू वीज बील भरण्यासाठी महावितरणकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. खोंडामळी उपविभागांतर्गत २३ ते २४ ट्रान्सफार्मर असून केवळ तीन ते चार ट्रान्सफार्मरचे बील जमा झाले आहे. तर उर्वरित २० ट्रान्सफार्मरचे वीजबील थकल्याने दोन दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. शेतकऱ्यांना वीज बील भरण्याचे आवाहन करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

शेतकरी आक्रमक

भालेर गावात वीज बिल वसुली साठी गेलेल्या महावितरणाच्या पाच ते सहा कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात बोलावले असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस फाटा सह येत डांबून ठेवल्याचा आरोप करत अखेर भालेर येथील युवराज पाटील, भिका पाटील, राहूल पाटील व दिनेश पाटील यांच्याविरोधात महावितरणने फिर्याद दिली आहे. या घटनेचा शेतकऱ्यांकडून तीव्र निषेध करण्यात येत असून शेतकरी आक्रमक झाले असून या घटनेचे तीव्र पडसाद पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boat accident: समुद्रात नाव उलटली, १५ मुलांसह १३९ जणांचा मृत्यू; ११६ जण बेपत्ता

Maharashtra News Live Update: पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

SCROLL FOR NEXT