Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Navapur News : कोंडाईबारी घाटात हातपाय बांधलेल्या स्थितीत आढळला तरुणाचा मृतदेह; चार दिवसांपासून होता बेपत्ता

Nandurbar News : धुळे जिल्ह्यातील साक्री पोलिसांना ११ जानेवारीला कोंडाईबारी घाटात हनुमान मंदिराजवळील वळणावरून खाली दरीत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली सईद शाह ८ जानेवारीपासून बेपत्ता होता

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नवापूर- धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील ३० ते ३५ फूट खोल दरीत चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाची स्थिती अत्यंत भयावह असून या तरुणाचा निर्दयतेने खून करून दरीत फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी येथील बेपत्ता तरुण सईद शाह चिराग शाह (वय ३२) याचा हा मृतदेह असल्याचे त्याच्या मृतदेहाचा फोटो वरून निष्पन्न झाले आहे. सईद शाह हा ८ जानेवारीपासून बेपत्ता होता. या प्रकरणी कुटुंबीयांनी साक्री पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर धुळे जिल्ह्यातील साक्री पोलिसांना ११ जानेवारीला कोंडाईबारी घाटात हनुमान मंदिराजवळील वळणावरून खाली दरीत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली. 

खून करून फेकल्याचा अंदाज 

कोंडाईबारीच्या घाटात मृतदेह ३० ते ३५ फूट खोल झुडपांमध्ये आढळून आला. मृताच्या तोंडावर कापड, तर हात-पाय दोरीने बांधलेल्या स्थितीत होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने या तरुणाचा खून करून त्याला चार दिवसांपूर्वीच फेकून दिल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. साक्री पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेमागील कारण आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपास जलद गतीने सुरू आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील तपासाची दिशा ठरवली जाणार आहे.

न्याय मिळून देण्याची मागणी 

दरम्यान घटनेमुळे विसरवाडी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी मारेकऱ्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तसेच घाट परिसरात सुरक्षाव्यवस्था वाढवावी, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. सईद शाह यांच्या कुटुंबीयांसाठी ही घटना अत्यंत दुर्दैवी असून आरोपींना कठोर शिक्षा होऊन न्याय मिळावा, अशी अपेक्षा संपूर्ण जिल्हा व्यक्त करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Pak : 3842 दिवसांची अजिंक्य घोडदौड! भारतानं हॉकीचं मैदान मारलं, पाकिस्तानला लोळवलं; वर्ल्डकपच्या टॉप ८ मध्ये दणक्यात एन्ट्री

Ladki Bahin Yojana: अपात्र लाडकींचा आकडा 92 लाखांवर; 4.5 लाख सरकारी लाडकींवर गुन्हा कधी?

Sugar Price Hike: साखरेचे दर 18 दिवसात पुन्हा वाढले; ग्राहकांना मोठा झटका, दरात वाढ का होतेय?

Nagpur Crime: नागपूर हादरले! सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शाळेच्या संचालकाला अटक

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT