Anil Patil Saam tv
महाराष्ट्र

Anil Patil News : व्हाट्सअप युनिव्हर्सिटीवर तयार केलेल्या सर्व्हेला अर्थ नाही; मंत्री अनिल पाटील

Nandurbar News : मंत्री अनिल पाटील हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी या दरम्यान माध्यमांशी संवाद साधत नुकताच जाहीर झालेल्या सर्व्हेवर प्रतिक्रिया देताना निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या सर्व्हेला महत्व नसल्याचे सांगितले

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्य शासनाकडून शेतकरी, महिला आणि युवकांसाठी चांगल्या योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णयाचे स्वागत शेतकरी करत आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान होत आहे, त्याला बाहेर काढण्याचे काम सरकार करत आहे. त्यामुळे या सर्वांना कुठलाही अर्थ नाही आहे. मुळात निवडणुकीच्या अगोदर व्हाट्सअप युनिव्हर्सिटी वर सर्वे तयार करत असल्याने त्याला काही अर्थ नाही; अशी प्रतिक्रिया मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. 

मंत्री अनिल पाटील हे नंदुरबार (Nandurbar) जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी या दरम्यान माध्यमांशी संवाद साधत नुकताच जाहीर झालेल्या सर्व्हेवर प्रतिक्रिया देताना निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या सर्व्हेला महत्व नसल्याचे सांगितले. तसेच भविष्यामध्ये युतीच्या मुख्यमंत्री राहणार. येणाऱ्या काळात पाच वर्षासाठी मुख्यमंत्री (Mahayuti) महायुतीचाच असेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. मात्र  जागा वाटप करण्याचे अधिकार तिघी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या आहे.

अतिवृष्टीच्या ठिकाणी पाच दिवसात मदत 
विदर्भ आणि मराठवाड्यात ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्या ठिकाणी चार ते पाच दिवसाच्या आत मदत मिळणार. अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान, जनावरांचे नुकसान व घरांचे नुकसान झाले असेल यांचे सर्व पंचनामे येणाऱ्या चार ते पाच दिवसात पूर्ण केले जातील. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर तातडीने मदत करण्याचे काम केले जाणार असल्याचेही अनिल पाटील (Anil Patil) यांनी सांगितले. 

नेत्याचा मुलगा म्हणून विरोधांकडून टार्गेट 

विरोधकांकडून नेत्याच्या मुलगा आहे, म्हणून टार्गेट केलं जाणं हे चुकीचे आहे. अपघात झाला हे चुकीचे आणि दुर्दैवाचा आहे. बावनकुळे यांनी माझा मुलगा असला तरी योग्य ती कारवाई केली पाहिजे; अशी प्रतिक्रिया दिली आहे. गाडीही तेजस बावनकुळे यांच्या नावाची आहे. मात्र त्यांची चुक नसेल तर त्यांना दोषी कसा धरावा; असे म्हणत अनिल पाटील यांनी तेजस बावनकुळे यांची पाठ राखण केली. तसेच पोलिसांनी निपक्षपणे चौकशी करावी शासनाची ही मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SIR Update : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! SIR प्रक्रियेसाठी मुदतवाढ; नागरिकांना दिलासा

Maharashtra Politics : संजय शिरसाट अडचणीत, मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा, भाजपच्या नाराजीनंतर शिंदे मोठा निर्णय घेणार?

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

SCROLL FOR NEXT