Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: बोगस आदिवासींच्या विरोधात विराट मोर्चा; आदिवासी मंत्राच्या विरोधात घोषणाबाजी

बोगस आदिवासींच्या विरोधात विराट मोर्चा; आदिवासी मंत्राच्या विरोधात घोषणाबाजी

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : महाराष्ट्रात अनेक बोगस आदिवासी सरकारी सेवेत कार्यरत आहेत. हे लोक खरे आदिवासी नसून बोगस आदिवासी आहेत. या बोगस आदिवासींना सेवेतून काढून खऱ्या आदिवासींना (Nandurbar News) सेवेत समाविष्‍ठ करा. अशी मागणी करत बोगस आदिवासींच्‍या विरोधात नंदुरबारमध्‍ये विराट मोर्चा काढण्यात आला. तसेच आदिवासी मंत्र्याविरोधात घोषणाबाजी केली. (Live Marathi News)

सरकारी सेवेतील जात प्रमाणपत्र अवैध ठरलेले कर्मचारी व जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या जवळपास १२ हजार ५०० कर्मचारी सेवेत असून या कर्मचाऱ्यांची तात्काळ सेवेतून काढले पाहिजे. मात्र शिंदे आणि फडणवीस सरकार तसं न करता या बोगस आदिवासींना संरक्षण देण्याचं काम करत आहे. यासाठी कॅबिनेटमध्ये या बोगस आदिवासींच्या संरक्षणावर कायदा देखील आणला गेला आहे. या कायद्याला राज्याच्या आदिवासी विकास मंत्री यांनी विरोध देखील केला नाही. त्यामुळे हा कायदा तात्काळ रद्द करावा; हा कायदा आदिवासींच्या विरुद्धच्या आहे.

आदिवासींच्या नावाने सरकारी नोकरीत घेणाऱ्या लोकांना तात्काळ सेवेतून काढावे आणि खरे आदिवासींना सरकारी नोकरीत समाविष्ट करून घ्यावे. धनगर समाजाला आदिवासी समाजात प्रवर्गात समावेश करू नये; अशी मागणी या मोर्चात करण्यात आली आहे. सरकारने या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष घेतले नाही तर यापेक्षाही मोठा मोर्चा येता काळात काढणार, असा इशारा माकापेचे आमदार विनोद भिवा यांनी दिले आहे. या मोर्चासाठी माकापाचे आमदार विनोद भिवा, शिंदे गटाचे आमदार मंजुळा गावित, माजी मंत्री पद्माकर वळवी आणि अनेक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT