Leopard Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: मोरकरंजा गावात बिबट्याची दहशत; गावात भीतीचे वातावरण

मोरकरंजा गावात बिबट्याची दहशत; गावात भीतीचे वातावरण

दिनू गावित

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील पुर्व पट्ट्यातील मोर करंजा, पानबारा, बर्डीपाडा, उचीशेवढी, जामनपाडा खोकसा, दापूर हे गाव अगदी डोंगराच्या (Nandurbar News) पायथ्याशी असल्याने वन्य प्राण्यांचा नेहमीच वावर असतो. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यात मोरकरंजा गावात रात्री बिबट्याचे (Leopard) दर्शन झाल्‍याने गावात दहशत अधिकच पसरली. (Breaking Marathi News)

धुळे (Dhule), नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेलगत असलेला कोंडाईबारी घाट रस्ता व डोंगरात जंगल मोठ्या प्रमाणावर असल्याने वनविभागाचे (Forest Department) अधिकारी इतर ठिकाणी नागरिकांना त्रासदायक असलेले बिबटे तसेच इतर वन्य प्राणी पकडून कोंडाईबारी घाटातील जंगलात सोडून जात असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला आहे. या ठिकाणी असलेल्या जंगलाच्या अधिवासात वन्यप्राणी सुरक्षित राहतील; या उद्देशाने वनविभागाने सोडलेले वन्य प्राणी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वस्त्यांमध्ये येत असल्याने नागरिकांसाठी धोकेदायक ठरत असल्याने वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

जंगल परिसरात गस्‍त

नवापूर तालुक्याच्या सुरुवातीला असलेले पहिले गाव मोरकरंजा गावात रात्री साडेदहा वाजता हनुमान मंदिराजवळ बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत वन विभागाने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. चिंचपाडा वनपरिक्षेत्रांतर्गत कार्यरत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून बिबट्याने दर्शन झालेल्या जंगल परिसरामध्ये गस्त सुरू असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुथडी वाहणाऱ्या मिठी नदीत तरूण वाहून गेला, एका दोरीमुळे बचावला; थरारक VIDEO समोर

Viral Video: ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का? पावसावर तरुणीचा भन्नाट रॅप, सोशल मीडियावर धुमाकूळ

Priya Bapat Photos : प्रिया बापटचा बॉसी लूक पाहिलात का? अभिनेत्रीच्या सौंदर्याने केली जादू

Maharashtra Rain Live News: मुसळधार पावसाने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक बंद

Marathwada Rain : मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटली; प्रमुख ११ धरणाची शंभरीकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT