Shahada News Leopard Saam tv
महाराष्ट्र

Leopard Entered Hospital : शहादा शहरातील रुग्णालयात घुसला बिबट्या; चार तासानंतर अडकला पिंजऱ्यात

nandurbar News : बिबट्या आल्याने रुग्णालयात असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ माजली होती

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: शहादा शहरातील मध्यवस्तीत असलेल्या आदित्य हॉस्पिटलमध्ये बिबट्याने प्रवेश केला. याबाबत (Nandurbar) वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर पथक रुग्णालयात दाखल होत पिंजरा लावण्यात आला होता. चार तासानंतर अखेर (Leopard) बिबट्याला पकडण्यात वन विभागाच्या पथकाला यश मिळाले. (Breaking Marathi News)

शहादा शहरातील आदित्य हॉस्पिटलमध्ये अचानक बिबट्या शिरला होता. बिबट्या आल्याने रुग्णालयात असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ माजली होती. शिवाय रुग्णालयात बिबट्या शिरल्याची माहिती शहादा शहरातील नागरिकांना जशी कळाली तशी रुग्णालया बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वनविभाग आणि पोलीस दलाच्यावतीने नागरिकांना रुग्णालयापासून दूर करत बिबट्याला पकडण्यासाठी सापडा टाकला होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वनविभागाने बिबट्याला जेरबंद जाण्यासाठी पिंजरा लावला होता. त्याला हटकत पकडण्याचा प्रयत्न सुरु झाले. मात्र बिबट्या पकडण्यात यश मिळत नव्हते, अखेर चार तासानंतर बिबट्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्या पिंजऱ्यात बंद झाल्यानंतर वनविभागाने सुटकेचा निश्वास सोडला. बिबट्याचा शहरी भागातील वावर हा चिंतेचा विषय बनला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT