Ladaki Bahin Yojana Latest News  Saam Tv
महाराष्ट्र

Ladaki Bahin Yojana: बँकेत चेंगराचेगरी, २ महिलांना भोवळ; KYC साठी २ किलोमीटरपर्यंत रांगा, पाहा VIDEO

Priya More

लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यभरातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत. हे पैसे काढण्यासाठी आणि केवायसी करण्यासाठी महिलांनी बँकांमध्ये मोठी गर्दी केली आहे. अशामध्ये नंदूरबारमधील स्टेट बँकेमध्ये महिलांनी मोठी गर्दी केली असून याठिकाणी चेंगराचेगरी झाल्याची घटना समोर आली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये दोन महिलांना भोवळ आली. सध्या या बँकेत आणि बँकेबाहेर महिलांची मोठी गर्दी झाली असून लांबपर्यंत रांगा लावण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव स्टेट बँक शाखेत चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत २ महिलांना भोवळ आली. ई केवायसीसाठी आदिवासी महिलांनी सकाळपासून बँकांसमोर तुफान गर्दी केली आहे. गर्दीमध्ये दोन महिलांचे प्रकृतिक खराब झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

बँकेत महिला आणि पुरुषांची स्वतंत्र रांग नसल्याने अनेक महिलांसोबत छेडखानी झाल्याचा प्रकार देखील समोर आला आहे. मात्र छेडखानी संदर्भात कोणत्याही महिलेने पोलिसात अद्यापही तक्रार दाखल केली नाही. ई केवायसी करण्यासाठी भर पावसात बँकेसमोर एक ते दोन किलोमीटर पर्यंत महिलांनी रांगा लावल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: ओल्या केसांमध्ये सिंदूर का लावू नये? जाणून घ्या शास्त्रीय कारण...

Marathi News Live Updates : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी

Mumbai News : मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

Viral News: शाब्बास पठ्ठ्यांनो! कपडे शिलाईसाठी तरुणांचा हटके जुगाड, थेट बाईकचा वापर करुन काम केलं सोपं; पाहा VIDEO

High Court News: विवाहित महिला लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचा आरोप करु शकत नाही: हायकोर्ट

SCROLL FOR NEXT