Nandurbar Accident Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Accident : कोंडाईबारी घाटात भीषण अपघात; अनियंत्रित ट्रक पलटी होऊन दोन तुकडे, चालक-सहचालक गंभीर जखमी

Nandurbar News : धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कोंडाईबारी घाटात ट्रकचा भीषण अपघात झाला असून ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने झालेल्या अपघातात ट्रकचे दोन तुकडे मालाने भरलेली ट्रक चकणाचूर झाला आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कोंडाईबारी घाटात दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक पलटी झाला. ज्यामुळे ट्रकचे दोन तुकडे झाले असून अपघातात ट्रकचा चालक आणि सहचालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील कोंडाईबारी घाट रस्त्यावर नेहमीच अपघात होत असतात. आज झालेल्या अपघातग्रस्त ट्रक रायपूरहून राजकोटच्या दिशेने माल घेऊन मार्गस्थ झाला होता. हा ट्रक कोंडाईबारी घाटातून जात असताना चालकाचा ताबा सुटला. यात ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक अनियंत्रित झाला आणि एका मोठ्या धडकेनंतर त्याचे अक्षरशः दोन तुकडे होऊन ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला.  

दोघेजण केबिनमध्येच अडकले 

अपघात इतका भीषण होता की, मालाने भरलेला ट्रक पूर्णपणे चकणाचूर झाला आहे. तर अपघातानंतर ट्रकचे कॅबिन देखील पूर्णपणे दाबले गेले होते. यामुळे ट्रकचा चालक आणि सहचालक वाहनाच्या केबिनमध्ये दाबले गेले होते. स्थानिक नागरिकांनी आणि मदतीसाठी धावलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढत तातडीने त्यांना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

वाहतूक विस्कळीत 

या भीषण अपघातानंतर ट्रकमधील संपूर्ण लोखंडी सळ्यांचा माल रस्त्यावर विखुरला होता. यामुळे महामार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; कार्ला फाट्याजवळ ५ किमीपर्यंत रांग

Maharastra : सर्वसामान्यांना झटका! कपड्यांची शिलाई महागणार, किती रुपये मोजावे लागणार? वाचा

बाहेरचं खाणं विसरून जाल, घरीच 10 मिनिटांत बनवा 'क्रिस्पी कॉर्न' रेसिपी

Vilas Ghule Case: विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाची चौकशी, ४ तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं?

Ex गर्लफ्रेंडसोबत मरायचा प्लान आखला, कारमध्ये बसून बॉम्बस्फोट केला, तरुण जिवंत जळाला अन्..;

SCROLL FOR NEXT