Holi Utsav Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: सातपुडा परिसरात होळी उत्सवाला सुरुवात; पहिली होळी दाब मोरीराहीपाडात

सातपुडा परिसरात होळी उत्सवाला सुरुवात; पहिली होळी दाब मोरीराहीपाडात

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यातील सातपुडा परिसरात आजपासून (१३ मार्च) होळी उत्सवाला सुरुवात होत असून आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या देवाची होळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डाब अर्थात हेलो दाब येथील मोरी-राही पाडा येथील होळी (Holi) पेटवून या चैतन्यमयी महोत्सवाला सुरुवात होणार आहे. (nandurbar news Holi celebrations begin in Satpuda area)

गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या या होलिकोत्सवसाठी यंदा आबालवृद्धांसह तरुण-तरुणींसह सर्वांनी तयारी सुरू केली आहे. आदिवासी समाजात होळी सणाला मोठे महत्त्व आहे. होळी सणानिमित्त बाहेरगावी रोजगारासाठी गेलेले बांधव परत आपल्या गावी येऊन होळी सण (Nandurbar News) साजरा करतात. होळीनिमित्त शेतीत व घरात भरभराटी यावी यासाठी नवस घेऊन ५ व सात ते नऊ दिवस (पाळणी) अर्थात पूजा विधी करून होळी सणात कमरेला घुंगरू डोक्यावर मोरपीस मोरखी, बावा बूध्या, डानका डोको, होळी सेवेकरी मोरखी, अशी वेशभूषा परिधान करून सोंग म्हणजेच पारंपारिक नृत्य सादर करून होळी सणात सहभाग घेतात.

२१ मार्चपर्यंत होळी उत्‍सव

आदिवासींचे कुलदैवत याहामोगी मातेचे जन्मस्थळ असलेल्या ऐतिहासिक हेलो दाब अर्थात डाब येथील देव होळी साजरी करून १३ ते २१ मार्च पर्यंत विविध गावांमधील नवसाच्या होळी उत्सव सुरू राहणार आहे. हेलो दाब अर्थात डाब येथील होळी पेटल्यानंतर या होळीच्या विस्तवाने १४ मार्चला मालपाडा, काकडपाटी, बदला पानबारी, पाडली येथे होळी साजरी होईल. यानंतर १५ मार्चला खुंटामोडी, बर्डी, १६ मार्चला कालीबेल, अस्तंबा, उर्मिलामाळ. १७ मार्चला सातपुड्यात प्रसिद्ध असलेली काठी येथील संस्थानिकांची राजवाडी होळी तसेच गदवाणी, उमरागव्हाण, १८ मार्च रोजी मोलगी व तलाई, १९ मार्चला जामली व असली, २० मार्च रोजी जमाना. तर २१ मार्चला धनाजे (बुगवड) येथील होळी साजरी करून सातपुड्यातील होलिकोत्सवाचा समारोप होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mini Cylinder: गॅस सिलेंडर घेणं झालं सोपं! अ‍ॅड्रेस प्रूफची गरज नाही, परत केल्यावर मिळणार रिफंड

Maharashtra Live News Update : अकोल्यात खळबळ! उच्चभ्रू वस्तीत सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश

Congress: मोठी बातमी! बारामती, राहुरीची पोटनिवडणूक काँग्रेस लढणार, हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; लक्ष्मण हाकेंची सरकारी अधिकाऱ्याला धक्काबुक्की, VIDEO

Nagpur : नागपूर हादरलं! दिवसाढवळ्या पोलिसाची निर्घृण हत्या, तिघांनी धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT