Nandurbar Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Heavy Rain : अक्कलकुवा, तळोदा तालुक्यात पावसाचा हाहाकार; पाच गावांचा संपर्क तुटला, गावात शिरले पाणी

अक्कलकुवा, तळोदा तालुक्यात पावसाचा हाहाकार; पाच गावांचा संपर्क तुटला, गावात शिरले पाणी

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन- तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. (Nandurbar) दरम्‍यान मंगळवारी रात्रीपासून पडलेल्या पावसामुळे तळोदा, अक्कलकुवा तालुक्यात मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) नदी नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील दोन गावातील घर पाण्याखाली गेली आहेत. सोरापाडा अलीविहीर, मौलीपाडा, इच्छागव्हाण, सिंगपूर शिर्वे या गावातील संपर्क तुटला आहे. (Breaking Marathi News)

नंदुरबार जिल्‍ह्यात सुरू असलेल्‍या पावसाने जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. तळोदा अक्कलकुवा तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाने हाहाकार माजवल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्‍यान मंगळवारी (११ जुलै) रात्रीपासून पावसाचे संततधार सुरू असल्याने अक्कलकुव्यातील सिंगपुर बुद्रूक गावाचा पुलावरून पाणी वाहू लागले आहे.

ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प

अनेक भागातील शेतात पाणी शिरले. यामुळे मुसळधार पावसाने शेताला तलावाचे रूप आले आहे. तळोदा (Taloda) तालुक्यातील सोरापाडा गावात पाणी शिरल्याने रस्ते पाण्याखाली गेल्याने ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. बस सेवा बंद करण्यात (Rain) आली आहे. या गावातील तीन चार घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे चांगलेच हाल झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: मोठी बातमी! ₹45 हजार किमान पेन्शन, वर्षातून 4 वेळा DA वाढीची मागणी

FSSAI pan masala rules: पान मसाल्याचे प्लास्टिक पाउच होणार बंद; FSSAIचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update : घाटकोपरमध्ये दरड कोसळली, 6 जणांचा मृत्यू

Delhi Pune Flight : दिल्ली - पुणे विमानात भयंकर घडलं! प्रवाशांची घुसमट झाली, घाम फुटला अन्...

Sleeping : पावसाळ्यात रात्री डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपताय? सावधान! शरीरावर होतायेत 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT