नंदुरबार 
महाराष्ट्र

नंदुरबारमधील मुख्य हजरत इमाम बादशाहचा उरुस यंदा रद्द

नंदुरबारमधील मुख्य हजरत इमाम बादशाहचा उरुस यंदा रद्द

दिनू गावित

नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी देखील मोहरमनिमित्त भरणारा इमाम बादशाहचा ऊरुस रद्द करण्यात आला आहे. सदरचा निर्णय हजरत सैय्यद अलाउद्दीन (इमाम बादशाह रहे) दर्गाचे अध्यक्ष समीउल्लाह मियाँ अब्दुलमियाँ जहागिरदार यांनी घेतला आहे. (nandurbar-news-Hazrat-Imam-Badshah-Urus-Nandurbar-canceled-this-year)

नंदुरबार येथे मोहरमनिमित्त इमाम बादशाहचा ऊरुस भरत असतो. राज्यासह गुजरात, मध्यप्रदेश राज्यातील भाविक दर्शनासाठी येतात. मागील वर्षापासून कोरोनामुळे शासनाने यात्रोत्सव रद्द केल्याने नंदुरबार येथील हजरत इमाम बादशाहचा ऊरुस मागील वर्षी रद्द करण्यात आला होता. यावर्षी कोरोनाची परिस्थिती पाहता खबरदारीच्या दृष्टीने मोहरमनिमित्त भरणारा यंदाचा ऊरुस देखील रद्द करण्याचा निर्णय हजरत सैय्यद अलाउद्दीन उर्फ इमाम बादशाह दर्गाचे अध्यक्ष समीउल्लाह मियाँ अब्दुलमियाँ जहागिरदार यांनी घेतला आहे.

पोलिस दलाकडून कौतुक

कोरोनाचा प्रादुर्भाव सध्‍या कमी असला तरी ऊरूस रद्दबाबत जिल्हा पोलीस विभागाला पत्र देवुन कळविले आहे. या निर्णयाचे जिल्हा पोलीस दलाच्यावतीने कौतुक करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

साखर महागली, ग्राहकांची पळापळ; बाजारात प्रतिव्यक्ती 1 किलोच साखर

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT