Navapur Police Saam tv
महाराष्ट्र

Navapur Police : गुजरात राज्याच्या बसमधून गुटखा तस्करी; प्रवाशी बसमधून साडेचार लाखाचा गुटखा जप्त

Nandurbar news : नवापूर शहर महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात सीमेवर असल्याने गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यात गुटख्याची तस्करी केली जाते. आता तर गुजरात राज्याची बसचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: बंदी असलेलय गुटख्याची चोरून तस्करी करण्यात येत आहे. या बाबत वारंवार कारवाई होत असताना देखील वाहतूक केली जात आहे. आता तर गुटखा तस्करी करण्यासाठी गुजरात राज्याच्या प्रवाशी बसचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. गुजरातच्या बसमधून महाराष्ट्रात आणला जात असलेला गुटखा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करत बसची तपासणी करून गुटखा जप्त केला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहर महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात सीमेवर असल्याने मोठ्या प्रमाणात गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यात गुटख्याची तस्करी केली जाते. आता तर चक्क गुजरात राज्याची बसचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. गोदरा- शिर्डी या बसमध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी नवापूर चेक पोस्ट जवळ बस उभी करत तपासणी केली.  

गुटखा जप्त करत एकजण ताब्यात 

तपासणी दरम्यान बसच्या लगेज डिक्कीमध्ये ४ लाख ४१ हजार रुपयाच्या विमल गुटखा मिळून आला. यानंतर सदर बस लागलीच नवापूर पोलीस स्टेशनला आणत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलावून अवैध गुटखा तस्करी विरोधात कारवाई करण्यात आली. यानंतर आरोपी रज्जाक अजीज लखनी (रा. नवापूर) याला ताब्यात घेतले असून नवापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चालक, वाहकांकडून तस्करी होत असल्याचा संशय 

दरम्यान अशा पद्धतीने गुटख्याची वाहतूक होत असल्याचे समोर आल्याने गुजरात बस चालक आणि वाहक हे गुटखा तस्करी करत असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रावण दत्त व अप्पर पोलीस अशित कांबळे यांच्या मार्गदर्शना खाली तसेंच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, जितेंद्र तांबोळी, जितेंद्र तोरवणे, अन्न सुरक्षा अधीकारी आ.बा पवार यांनी केली. पुढील तपास नवापूर पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad: कारने वाहतूक पोलिसासह तिघांना उडवलं, मुंबई-गोवा महामार्गावरील थरारक घटना

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

SCROLL FOR NEXT