Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar : नंदुरबारचे पालकमंत्री हरवले?; दोन महिने होऊनही न आल्याने जिल्ह्यात जोरदार चर्चा

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद सिन्नर विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले. मात्र मंत्री कोकाटे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर खूप कमी आले

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: राज्याचे कृषिमंत्री आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे गेल्या दोन महिन्याहून अधिक काळापासून नंदुरबार जिल्ह्यात आलेले नाहीत. यामुळे पालकमंत्री हरवले अशी जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. अर्थात पालकमंत्री येत नसल्याने जिल्हा पोरका झाला का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.  

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद सिन्नर विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले. मात्र मंत्री कोकाटे हे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर खूप कमी वेळा आहेत. यातच मागील दोन महिन्यांपासून एकदा देखील पालकमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले नसल्याने नंदुरबार जिल्ह्यात पालकमंत्री हरवल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 

एकदाच आले जिल्ह्यात 

माणिकराव कोकाटे यांना नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर त्यांनी आढावा घेण्याच्या अनुषंगाने जिल्ह्याचा दौरा अद्याप केलेलाच नाही. पालकमंत्री झाल्यानंतर माणिकराव कोकाटे हे फक्त २६ जानेवारीला ध्वजारोहणासाठी नंदुरबार आले होते. यानंतर आता दोन महिन्यांपेक्षा अधिकच कालावधी लोटला गेला आहे. तरी देखील जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले नाहीत. यामुळे नंदुरबार जिल्हा पोरकाच असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 

नुकसानीच्या पाहणीसाठी येतील का?  

दरम्यान नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा आणि गंगापूर या भागात बुधवारी वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. त्यात कांदा, मका या सोबतच अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. यासोबतच सहा घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी तरी पालकमंत्री तथा राज्याची कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे नंदुरबारला येतील का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

SCROLL FOR NEXT