Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: केळीच्या बागेत पोलिसांची धाड; माजी जिल्हा परिषद सदस्याच्या शेतात समोर आला धक्कादायक प्रकार

Nandurbar News : केळीच्या बागेत गांजाची शेती होत असल्याची गोपनीय माहिती बातमीदाराने पोलिसांना दिली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भंगार अवैधरित्या गांजाची शेती केली जात असल्याचे समोर आले आहे. यात (Nandurbar) अनेकजण शेतात लावलेल्या पिकांच्या आडून गांजा लागवड करत असतात. मात्र माजी जिल्हा परिषद सदस्याच्या शेतातच गांजाची लागवड करण्यात आल्याचे (Shahada) शहादा तालुक्यातील नवागाव येथे उघडकीस आले आहे. (Tajya Batmya)

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात शेतात लागवड केलेली जवळपास १ कोटी रुपयांचा गांजा पोलिसांनी (Police) उध्वस्त केल्याची कारवाई आज करण्यात आली आहे. यानंतर नंदुरबार जिल्ह्यात देखील पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवागाव येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्याने केळीच्या बागेत गांजाची शेती होत असल्याची गोपनीय माहिती बातमीदाराने पोलिसांना दिली. या माहितीवरून शहादा पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबार पथकाने शेतात अचानक धाड टाकली.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१७ लाखाचा मुद्देमाल जप्त 

पोलिसांनी धड टाकत केलेल्या कारवाईत २५३ किलो १८ ग्रॅम वजनाचे गांजा मिळून आला. बाजारभावाप्रमाणे या गांजाची किंमत १७ लाख ७४ हजार ६६२ रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात सुनील चव्हाण यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे जिल्ह्यात अमली पदार्थ मुक्ताच्या गोष्टी करणाऱ्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी केलेली ही कारवाईमुळं नंदुरबार जिल्ह्यात खरंच आमले पदार्थ मुक्त जिल्हा आहे का असा काहीसा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक- मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावर कारला भीषण अपघात

SSC HSC Student: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Accident : हृदयद्रावक! काही दिवसांवर लग्न, पत्रिका वाटण्यासाठी जाताना भरधाव कारने चिरडले; नवरदेवासह दोघांचा मृत्यू

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT