महाराष्ट्र

सागवान लाकडाच्‍या २२ खाटा जप्‍त; बेकायदेशीर सुरू होती विक्री

सागवान लाकडाच्‍या २२ खाटा जप्‍त; बेकायदेशीर सुरू होती विक्री

दिनू गावित

नंदुरबार : धडगाव शहरातील बाजारपेठेत सागवान लाकडाच्या बेकायदेशीर खाटा तयार करून विक्री केली जात होती. या विक्री करणाऱ्यांवर वन विभागाने कारवाई करत २२ खाटा जप्त केल्‍या. (nandurbar-news-forest-department-22-beds-of-teak-wood-seized-The-sale-was-started-illegally)

धडगाव वनविभागाच्या परिक्षेत्रातील जंगलातून बेकायदेशीररित्या सागवान लाकडांची तोड करून खाटा तयार केल्‍या जात होत्‍या. या खाटा धडगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या विक्रेत्यांकडून वनविभागाने २२ खाटा जप्त करत कारवाई केली आहे. वन विभागाच्या माहितीनुसार सदर खाटांची किंमत एकूण ४३ हजार २०० रुपये आहे.

माल सोडून विक्रेते गायब

धडगाव तालुक्यातील खेड्या पाड्यावरून शहरात बाजाराच्या दिवशी तयार सागवानी लाकडाच्या खाटा विक्रेते मोठ्या संख्येने घेऊन येत असल्याची तक्रार होती. यावर वन विभागाने कारवाई सुरु करत शहरातील स्टेट बँकेसमोर तयार खाटा विक्रीसाठी बसलेल्या विक्रेत्यांकडून सुमारे २२ सागवानी लाकडाच्या खाटा ताब्यात घेत कारवाई केली. वन विभागाच्या या धडक कारवाई मुळे अवैध लाकडी वस्तू बनवून विकणार्यांचे धाबे दणाणले असून अनेक खाटा विक्रेत्यांनी मुद्देमाल सोडून घटनास्थळावरून पोबारा केल्याने वन कर्मचार्यांच्या हाती केवळ २२ खाटा लागल्या. सदर कारवाईबाबत वनरक्षक धडगाव यांनी वन गुन्हा नोंद करून आरोपींचा शोध सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT