Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap: कार्यकारी अभियंत्‍याला रंगेहाथ पकडले; ठेकेदाराकडून मागितली होती 43 लाखाची लाच

कार्यकारी अभियंत्‍याला रंगेहाथ पकडले; ठेकेदाराकडून मागितली होती 43 लाखाची लाच

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहादा विभागाच्या कार्यकारी अभियंता महेश पाटील यांनी ठेकेदाराकडून ४३ लाखाच्या लाचेची (Bribe) मागणी केली. यातील पहिला हप्‍ता स्‍वीकारताना कार्यकारी अभियंत्‍यास रंगेहाथ पकडले. (Nandurbar) नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ACB) रंगेहाथ अटक केली आहे. (Letest Marathi News)

ठेकेदारांनी केलेल्या तीन कोटी रुपयांचा कामाचे बिल मिळावे. तसेच मंजूर असलेल्या पाच कोटी रुपयांच्या कामांच्या कार्यारंभ आदेश मिळावा. यासाठी शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील यांनी संबंधित ठेकेदाराकडून ४३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत ठेकेदाराने नंदुरबार एसीबीकडे तक्रार दिली होती.

साडेतीन लाखाचा पहिला हप्‍ता

लोचेची मागणी केलेल्‍या रक्‍कमेतील पहिला हप्ता म्हणून साडेतीन लाख रुपये स्वीकारताना पाटील यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी रंगेहात पकडण्यात आले. बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टाकणाऱ्या या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. सदरची कारवाई नंदुरबार लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक राकेश चौधरी यांच्या पथकाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांना राज्य मानवाधिकार आयोगाचे समन्स

Tharala Tar Mag! : सायलीला लागले डोहाळे, अर्जुन लाडक्या बायकोसाठी बनवतो लाडू; प्रियामुळे दोघांच्या आनंदाला लागणार ग्रहण | VIDEO

Rain Alert: विजांचा कडकडाट अन् वादळी वारे, आजपासून पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Nashik : नाशिकातील पर्यटनस्थळ बनतायत गुन्हेगारीचा अड्डा, भावलीत पर्यटकांवर हल्ला; ९ जणांवर गुन्हा

Bhajyachi Amti Recipe : वरण - भात कशाला? आजच बनवा ही झणझणीत भज्यांची आमटी

SCROLL FOR NEXT