Corona Free Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: तिसऱ्या लाटेतून जिल्हा कोरोनामुक्त; रुग्णांची संख्या शून्यावर

तिसऱ्या लाटेतून जिल्हा कोरोनामुक्त; रुग्णांची संख्या शून्यावर

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे ओसरली असल्याची चिन्हे कोविड रुग्णालयांमध्ये पाहावयास मिळत आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील सर्व सहा तालुके कोरोनामुक्त (Corona) झाले असून एकही बाधित रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. (nandurbar news District Corona free from the third wave)

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (Corona Third Wave) १ जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली होती. यातून १ जानेवारी ते २२ मार्च या काळात ६ हजार ३६६ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. पहिल्या आणि दुसऱ्या कोरोनाच्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेतील रुग्ण संख्या अत्यंत कमी आहे. तिसऱ्या लाटेत जवळपास सात कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

बाधितांची संख्‍या शुन्‍यावर

एकूणच लसीकरणाचे प्रमाण व नागरिकांनी कोविड नियमांची स्वयंस्फूर्तीने घेतलेली काळजी तसेच संसर्गजन्य रुग्णांना आरोग्य विभागाच्यावतीने केलेल्या तात्काळ उपचारामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी होण्यात मदत झाली. सध्या स्थितीत (Nandurbar News) जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या शून्यावर पोहोचली आहे.

कोरोनाने ९६१ मृत्‍यू

जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ९१ हजार १८८ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी ४४ हजार ११७ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. उपचारादरम्यान ४३ हजार १५६ रुग्ण बरे झाले असून जिल्ह्यात आतापर्यंत ९६१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection In Monsoon : पावसाळ्यात वारंवार होतेय युरिन इन्फेक्शन? मग 'या' चुका अजिबात करूच नका

Maharashtra News Live Update: पंढरपूरात पैशाची मागणी करत हल्ला; गाडीची तोडफोड

Yavtmal : निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई; १० प्रकरणांत गुन्हे, दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंद

ITR Filing 2026 : पगार १२.७५ लाखांपर्यंत असला तरीही भरावे लागेल टॅक्स, काय त्यामागचं नेमकं कारण?

Wi-Fi Tips : Wi-Fi चा स्पीड वाढवायचा आहे? ८ सोप्या ट्रिक्सने इंटरनेट होईल सुपरफास्ट

SCROLL FOR NEXT