Navapur Ration Shop Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : दोन रेशन परवाने असूनही वितरण एकच ठिकाणी; हक्काच्या रेशनपासून अनेक लाभार्थी वंचित

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात शासनमान्य दोन रेशन दुकान आहेत. मात्र ती फक्त कागदावर सुरू असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : शासनाकडून गोरगरीब नागरिकांना कमी दरात रेशन दिले जात असते. यासाठी शासनमान्य रेशन दुकानदारांकडून (nandurbar) वितरणाचे काम देखील करण्यात येत असते. या दुकानदारांना आपल्या परिसरातील पात्र शिधापत्रिका धारकांना (Ration) रेशन देणं बंधनकारक आहे, मात्र नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात गरजू लोकांना स्वस्त राशनपासून वंचित राहावे लागत आहे. (Breaking Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर (Navapur) तालुक्यातील खांडबारा गावात शासनमान्य दोन रेशन दुकान आहेत. मात्र ती फक्त कागदावर सुरू असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दुकानांचे परवाने (Ration Shop) असूनही एकच दुकानावर धान्य वितरण सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे खांडबारा गावातील सरपंच अजय गावित यांनी रेशन दुकानावर भेट दिली असता रेशनिंग दुकानांचे दोन परवाने असून एकच ठिकाणहुन वितरण होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यापूर्वीही तक्रार मात्र कारवाई नाही 
खांडबारा गावातील नागरिकांना पुरेशा रेशनिंग मिळत नसल्यामुळे अनेक वेळा शासन दरबारी तक्रारी केल्या आहेत. तरी देखील कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे कोणाच्या आशीर्वादाने हे मनमानी कारभार सुरू आहे; असाच काहीसा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : ST प्रवाशांचा जीव धोक्यात; महामंडळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडूनच विभागाचा कारभार उघड

Vice President Election: इंडिया आघाडीची मतं फुटली; कोणी केली क्रॉस व्होटींग, कुठे गेम फिरला?

Wednesday Horoscope : संकष्टी चतुर्थीला बाप्पा ५ राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण करणार; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Nepal Crisis : माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, आंदोलकांनी पेटवलं होतं घर

Nepali celebrities: मनीषा कोइरालापासून सुनील थापापर्यंत, या नेपाळी सेलिब्रिटींनी मनोरंजन विश्वातून जिंकली चाहत्यांची मनं

SCROLL FOR NEXT