Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : पाण्याची मोटर सुरु करताना विजेचा धक्क्याने इसमाचा मृत्यू

Nandurbar News : दुपारी शेतातून घरी आल्यावर ते घरातील पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेले. यावेळी त्यांना विजेचा जोरदार झटका लागून ते बाजूला फेकले

Rajesh Sonwane

नंदुरबार : नळाला पाणी आल्याने घरातील पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या इसमाला विजेचा जोरदार झटका बसला. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील कळंबू या गावात घडली आहे. संजय बोरसे असे मृत व्यक्तीचे नाव असून गावातील प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती. .

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील कळंबू गावातील प्रगतिशील शेतकरी संजय आत्माराम बोरसे (वय ५८) हे सकाळी शेतात गेले होते. दरम्यान दुपारी शेतातून घरी आल्यावर ते घरातील पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेले. यावेळी त्यांना विजेचा जोरदार झटका (Electric Shock) लागून ते बाजूला फेकले जाऊन बेशुद्ध पडले. घडला प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आल्याने त्यांना ताबडतोब शेजारील व कुटुंबाच्या मदतीने उपचारासाठी शहादा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. 

शहादा येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. साठे यांच्या मार्गदर्शनाखाली शवविच्छेदन करण्यात आले. मृत बोरसे हे गावात व परिसरात प्रगतिशील शेतकरी म्हणून परिचित होते. दुर्दैवी घटनेमुळे परिवार व गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत सारंगखेडा पोलिसांत रामराम बोरसे यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chapati Tips : रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवता? ही १ चूक पडू शकते महागात

Maharashtra News Live Update: जालना जिल्ह्यात हैदराबाद गॅझेटनुसार 421 अर्जापैकी 377 प्रमाणपत्र वितरित

Friday Horoscope: आर्थिक लाभ, प्रेमाची कबुली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

SCROLL FOR NEXT