मृतदेह 
महाराष्ट्र

Nandurbar Breaking : आश्रम शाळेच्‍या आवारात विद्यार्थ्यांचा मृतदेह; नवापूर तालुक्‍यातील घटना

आश्रम शाळेच्‍या आवारात विद्यार्थ्यांचा मृतदेह; नवापूर तालुक्‍यातील घटना

दिनू गावित

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील शासकीय आश्रम शाळेतील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी सदर घटना उघडकीस आली असून आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकाऱी शाळा प्रशासनाचे सोयी सुविधांकडे दुर्लक्षामुळे सदर प्रकार झाल्‍याचे सांगितले जात आहे. (nandurbar-news-Dead-bodies-of-student-in-the-premises-of-Ashram-School-Incidents-in-Navapur-taluka)

नवापुर तालुक्यातील धनराट शासकीय आश्रम शाळेत इयत्ता दहावीत शिकत असलेल्या भाऊ करज्या गावीत (वय १६) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर विद्यार्थ्याचा मृतदेह सकाळी साडे सहाच्या दरम्यान शाळेच्या आवारात पडलेला आढळून आला. विद्यार्थ्यांनी शिपाईला सांगितल्यावर त्याने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मुलाचा मृतदेह पालकांच्या हाती देण्यात आला असून त्यावर भोवरे या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच मृत्‍यू

अवघ्या सोळा वर्षीय विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यू आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी व शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच झाला असल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे. अनेक आश्रम शाळांमध्ये पर्याप्त सुविधा उपलब्ध नाहीत. यावर वारंवार पालक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून मागणी करून देखील आदिवासी विकास विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करतात.

सकाळी व्‍यायाम करताना पडला

सदर विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत प्रकल्प अधिकारी व शाळा प्रशासनाने सकाळी व्यायाम करण्यासाठी गेले असता रनिंग करताना खाली पडला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले होते अशी माहिती देण्यात आली आहे. यावर पालकांनी आक्षेप घेत सदर विद्यार्थ्याचा मृत्यू हा शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घटनेचा अधिक तपास नवापूर पोलिस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT