crime news 
महाराष्ट्र

Nandurbar : रात्रीत दोन खून; हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याचा वाद

धक्‍का लागला अन्‌ छातीवर नाचले

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी दोन युवकांचा खून झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. यात लग्‍नाच्‍या हळदीच्‍या कार्यक्रमात नाचताना धक्‍का लागल्‍याचे कारण ठरले. तर अन्‍य एका घटनेत अज्ञाताने गळा दाबून खून केल्‍याची घटना घडली आहे. (Nandurbar-news-crime-news-Two-young-boy-kill-the-night)

धक्‍का लागला अन्‌ छातीवर नाचले

नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील मोठे उमज येथे लग्नात हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याच्या वादातून २५ वर्षीय युवक इज्जाक उर्फ मुंडा मजनू वळवी याचा खून (Crime) झाला. धक्‍का लागल्‍यानंतर युवकाला खाली पाडून त्‍याच्‍या छाती व पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जमिनीवर खाली पाडून अंगावर कुदून बसून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर घटनेत नंदुरबार उपनगर पोलिस (police) ठाण्यात मायकल राजू वळवी, हेंगऱ्या कृष्णा वळवी, राजीव स्वरूपसिंग गावित, चंद्रसिंग गोपीचंद गावित, व एक अल्पवयीन शेतीची रोशन वळवी अशा सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञाताने दाबला गळा

दुसरी घटना तळोदा (Taloda) तालुक्यातील रेवानगर येथे घडली. रेवानगर येथील १८ वर्षीय विपुल टेट्या पावरा या युवकाचा अज्ञाताने गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. मयताचे वडील टेट्या वनकर पावरा यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT