Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar : पंचायत समिती इमारतीच्या भूमीपूजनावरून श्रेयवादाची लढाई; भाजप- शिवसेना आमने सामने

Nandurbar News : कोणतेही सरकार असो, जेव्हा एखादी वास्तू मंजूर होते, तेव्हा जो आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्य असतो. त्याला अधिकार असतात. काही लोक अजूनही स्वतःला मंत्री, अध्यक्ष किंवा खासदार समजत आहेत

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: धडगाव पंचायत समितीच्या कार्यालय बांधकामाचे भूमिपूजन पार पडले आहे. मात्र या एकाच कामाचे भूमिपूजन दोनदा झाले आहे. अर्थात इमारत उभारणीवरून भाजप आणि शिवसेना आमने सामने आले असून यावरून दोन्ही पक्षात श्रेय वादाची लढाई सुरु झाली आहे. तर यावरून आमदार आमश्या पाडवी यांनी नाव न घेता गावित परिवार हल्लाबोल केला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा- अक्राणी मतदार संघाचे आमदार आमश्या पाडवी यांनी धडगाव पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या श्रेयावादाच्या लढाईवर आपले मत व्यक्त केले आहे. आमदार पाडवी यांच्या म्हणण्यानुसार धडगाव येथील पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी जमीन मंजूर झाली असून आज त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे. ते म्हणाले की ही इमारत अतिशय चांगली होणार आहे. त्यांनी खास करून या इमारतीच्या मंजुरीसाठी प्रयत्न केलेल्या सभापतींचे आणि इतर पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

काहींना अजूनही स्वप्न पडताय 

आमश्या पाडवी यांनी असेही सांगितले की, काही लोकांना अजूनही असे स्वप्न पडत आहे की ही वस्तू त्यांची आहे आणि त्यांनी ती करायला पाहिजे. कोणतेही सरकार असो, जेव्हा एखादी वास्तू मंजूर होते, तेव्हा जो आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्य असतो. त्याला त्याचे अधिकार असतात. काही लोक अजूनही स्वतःला मंत्री, अध्यक्ष किंवा खासदार समजत आहेत. त्यांचे कार्यकर्तेही असेच मोठे स्वप्न पाहत आहेत. पण हे योग्य नाही, असेही पाडवी म्हणाले.

मतदारसंघाचा आमदार म्हणून, मी आज जाहीर करतो की या इमारतीचे उद्घाटन मी केले आहे. माझ्यासोबत शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, ज्यात सभापती यांचा समावेश आहे. त्यांनी जोर देऊन सांगितले की या बिल्डिंगचे भूमिपूजन त्यांनीच केले आहे आणि ज्यांना स्वप्न पडत आहे, की ही इमारत त्यांची आहे. ते त्यांची पंचायत समितीची दुसरी बिल्डिंग बांधून घेतील. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veen Doghatli Hi Tutena : अखेर तो क्षण आला; समर-स्वानंदी समोरासमोर, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई दौरा

Ganesh Chaturthi 2025: चतुर्थीला कधी आहे गणेश स्थापनेचा मुहूर्त? जाणून घ्या स्थापनेची योग्य विधी

Whatsapp New Feature: तुम्हाला मिळालेली माहिती खरी की खोटी? Whatsapp देणार खात्री, जाणून घ्या नवं फिचर

Car Accident : भीषण अपघात; अनियंत्रण कार ४० फुटावरून नदीत कोसळली, तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT