Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: दुर्गम भागातील चांदसैली घाटात कोसळली दरड

दुर्गम भागातील चांदसैली घाटात कोसळली दरड

दिनू गावित

नंदुरबार : तळोदा आणि धडगाव तालुक्याला जोडणाऱ्या चांदसैली घाटात मुसळधार पावसाने (Heavy Rain) मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या. यामुळे या मार्गावरची वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी मिळून काही प्रमाणात रस्त्यावरची दरड हटवल्यानंतर दुचाकी वाहने या रस्त्यावरुन ये जा करतांना दिसत होती. मात्र ती मातीत फसत असल्याने वाहन धारकांना (Nandurbar) मोठा त्रास होत होता. (Nandurbar News Heavy Rain)

धडगाव तालुक्यातील नागरिकांना (Taloda) तळोदा– नंदुरबार या ठिकाणी येण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणून वापर केला जातो. अत्यावश्यक सेवेतील रुग्ण व जिल्ह्याच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकां द्वारे या घाट रस्त्याचा वापर केला जातो. त्यामुळे प्रशासनाने वाहन धारकांसाठी सदर रस्त्यावर कोसळलेली दरड हटवून रस्ता रहदारीसाठी सुरक्षित करावा; अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.

कायमस्वरूपी हवी ठोस उपाययोजना

दुर्गम भागातील नागरिकांना जोडणारा चाँदसेली घाट रस्ता पावसामुळे वारंवार दरडी कोसळून बंद होत आहे. मात्र संबंधित विभागाची कमालीची उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे या मार्गावर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. चांदसैली घाट रस्ता बंद असल्याने नागरिकांना शहादा मार्गे धडगावला जाण्यासाठी शंभर ते दीडशे किलोमीटर अधिकचा प्रवास करून त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bangladesh: आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग; धुराच्या काळोखात विमानतळ गुडूप, धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी

Ind vs Aus : विराट कोहली-रोहित शर्माचं कमबॅक लांबणीवर? ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधून आली सर्वात धक्कादायक अपडेट

Pneumonia Symptoms: न्यूमोनिया कोणता आजार आहे? त्याची लक्षणे कोणती?

२१ दिवस गव्हाची चपाती नाही खाल्ली तर? शरीरात दिसतील आश्चर्यकारक बदल, तज्ज्ञ सांगतात..

SCROLL FOR NEXT