corona rules 
महाराष्ट्र

Nandurbar : सारंगखेडा घोडेबाजारात कोरोना नियमांचा फज्जा

सारंगखेडा घोडेबाजारात कोरोना नियमांचा फज्जा

दिनू गावित

नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये; यासाठी सारंगखेडा येथील यात्रा उत्सव रद्द केला आहे. कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटींवरच घोडेबाजाराला परवानगी दिली. मात्र आयोजक व व्यापाऱ्यांकडून घोड्यांच्या अव्वाच्या सव्वा किमती सांगून ग्राहक व नागरिकांना आकर्षित करून गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला जात आहे. (Nandurbar-news-Corona-rules-frenzy-in-Sarangkheda-horse-market)

घोडे बाजारात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे लसीकरण (Corona Vaccination) प्रमाणपत्र चेक करणे गरजेचे आहे. तसेच मास्क लावणे अनिवार्य असतानाही अनेक व्यापारी व नागरिक विनामास्क फिरताना आढळून येत आहे. नाताळाची सुट्टी व रविवारनिमित्त मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. घोडे बाजारात देशातील विविध राज्यातून खरेदी- विक्रीसाठी आलेल्या व्यापारी व नागरिकांद्वारे नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याला कोरोनाचा (Corona) धोका वाढला आहे. प्रशासन व आयोजक मात्र बेफिकीर आहे.

पारिवारीक कार्यक्रमांना बंधने

जिल्हा प्रशासनाच्यावतीने इतर सांस्कृतिक व परिवारिक कार्यक्रमांना कोरोनाचे कारणे देत बंधने घातली जात आहे. मात्र खुलेआम याठिकाणी घोडेबाजाराला परवानगी देऊन कोरोना नियम पायदळी तुडवले जात असतानाही प्रशासन कारवाईसाठी दुर्लक्ष करून कोरोनाला आमंत्रण देत असल्याचे चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyadarshini Indalkar Photos: 'अगं तुझ्या एका नजरेने जीव झाला वेडापिसा' प्रियदर्शनीचे स्टायलिश फोटोशूट

Lawrence of Punjab: 'लॉरेन्स ऑफ पंजाब' वादाच्या भोवऱ्यात; रिलीजआधीच बंदीची मागणी; नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भाजपच्या महिला मोर्चाचे काँग्रेस पक्षाविरोधात आंदोलन

Diva - Chiplun Railway : कोकणवासीयांठी आनंदवार्ता! दिवा- चिपळूण विशेष मेमू धावणार, कधी आणि कुठून किती वाजता सुटणार? वाचा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! बेसिक सॅलरी १८,००० वरुन ७२,००० होणार? कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत तरी काय?

SCROLL FOR NEXT