Navapur Accident Saam tv
महाराष्ट्र

Navapur Accident : चरणमाळ घाटात भीषण अपघात; जनावरांना घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला, २६ म्हशींचा मृत्यू

Nandurbar News : पिंपळनेरकडून सकाळी सात वाजता गुजरातकडे जात असताना ट्रक चरणमाळ घाटात रस्त्याच्या वळणावर आल्यावर चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे घाट रस्त्यातील वळणावर ट्रँक पलटी झाला आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. जनावरांना घेऊन जाणारा ट्रक घाट रस्त्यात पलटी झाला असून अपघातात म्हशीचे पिल्लू वासरू ठार झाले आहे. तर काही म्हशीचे रेडकू जखमी झाले आहेत. शिवाय ट्रक चालक देखील गंभीर जखमी झाला असून जखमीला लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात असलेल्या चरणमाळ घाट रस्त्यात सकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. सकाळी म्हशी व वासरु घेऊन ट्रक पिंपळनेरकडून गुजरातच्या दिशेने जात असल्याचे समजते. पिंपळनेरकडून सकाळी सात वाजता गुजरातकडे जात असताना ट्रक चरणमाळ घाटात रस्त्याच्या वळणावर आल्यावर चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे घाट रस्त्यातील वळणावर ट्रँक पलटी झाला आहे. 

ट्रक चालक गंभीर जखमी 

घाट रस्त्यात ट्रक पलटी झाल्याने ट्रक रस्त्याच्या खाली खोल दरीत गेला. अपघात होताच घाट परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. अपघातग्रस्त ट्रकमध्ये ३५ रेडकू होते. यात २६ जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच अपघातात ट्रक चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. स्थानिक नागरिकांनी जीवनधारा अम्बुलनला संपर्क साधून जखमींना तातडीने उपचारासाठी लाजरस गावीत यानी उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे दाखल केले. 

अपघाताची मालिका सुरूच 

चरणमाळ घाटात अपघाताची मालिका सुरु असते. या घाटात जास्त प्रमाणात उतार असल्यामुळे येथे नेहमी अपघात होत असतात. चरणमाळ घाटात यापूर्वी अनेक अपघात होऊन अनेकांचे प्राण जाऊन काहींना अपंगत्वही आले आहे. चरणमाळ घाट दुरुस्तीच्या प्रश्न वारंवार येत असतो. मात्र काही काळानंतर हा प्रश्न विसरला जातो. चरणमाळ घाट केव्हा दुरुस्त होणार आहे; असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT