Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: चांदसैली घाट बनला मौत का कुवा; घाटात कुठं दरड कोसळली तर कुठं रस्ता खचलेला

चांदसैली घाट बनला मौत का कुवा; घाटात कुठं दरड कोसळली तर कुठं रस्ता खचलेला

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : धडगाव तालुक्याला नंदूरबार जिल्ह्याशी जोडणारा चांदसैली रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. घाटमार्गे असलेला हा रस्ता सातपुडा आणि नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्याशी जोडणारा असून संबंधीत विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचा भराव खचला असून वाहन चालकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. संबंधीत विभागाने चांदसैली (Chandsaili) रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. (Maharashtra News)

धडगाव तालुक्यातील चांदसैली हा रस्ता धडगाव येथे येण्यासाठी सोयीचा आहे. कारण चांदसैली मार्गे धडगावला ये-जा करण्याचे अंतर कमी असते. गेल्या २ वर्षांपासून चांदसैली घाटातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. मध्यंतरी या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एसटी महामंडळाची बस देखील बंद झाली होती. आता पुन्हा या रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने वाहन चालक व प्रवाशांसाठी हा मार्ग धोकेदायक ठरत आहे. धडगाव ते तळोदा (Taloda) असा प्रवास करतांना चांदसैली घाट येत असतो. परंतू अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने भराव खचल्याने रस्ते अरुंद झाले आहे. मागील दोन वर्षापासून चांदसैली रस्त्याची जैसे थे अवस्था असल्याने संबंधीत विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. समोरुन येणार्‍या वाहनाला पुढे मार्गस्थ करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

जिल्हाधिकारींच्‍या आदेशाला केराची टोपली

नंदुरबारचे जिल्हाधिकारी यांनी सदर रस्त्याचे दुरुस्तीचे आदेश अधिसूचना काढून संबंधीत विभागाला दिले होते. परंतू जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केचराची टोपली दाखविण्यात आली. रस्ता दुरुस्ती न करता काही ठिकाणी संरक्षण भिंती बांधल्याचे बोलले जात आहे. रस्त्याची दुरावस्था जैसे थे असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! हे आयडी लगेचच तयार करा, अन्यथा पीएम किसान योजनेचा हप्ता विसरा

Chhattisgarh : ३६ किल्ल्यांची भूमी छत्तीसगड! भारतात लपलेला ऐतिहासिक खजिना, तुम्ही कोण-कोणते किल्ले पाहिलात?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचे भाजप कार्यालयावर आंदोलन

Good News : LPG दरात झाली मोठी घट, ऑटो चालकांना मोठा दिलासा, पाहा आता किती रूपयांना मिळणार?

पांढरे केस होतील काळे! तुरटी आणि आवळ्याचा 'हा' सोपा उपाय ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT