Nandurbar Accident News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: दसऱ्यासाठी मुलाला घरी घेऊन जाताना अपघात; आई– वडीलांसह मुलगा गंभीर जखमी

दसऱ्यासाठी मुलाला घरी घेऊन जाताना अपघात; आई– वडीलांसह मुलगा जखमी

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील श्रावणी येथील नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या (Student) विद्यार्थ्यांला आई- वडील घरी घेऊन जात होती. या दरम्‍यान निंबोणी गावाजवळ त्‍यांच्‍या वाहनाला झालेल्या अपघातात (Accident) विद्यार्थ्यासह त्याचे आई- वडील गंभीर जखमी झाले आहे. (Nandurbar Accident News)

विसरवाडी– नंदुरबार (Nandurbar) रस्त्यावर निंबोणीनजीक डंपर व जीप यांच्यात हा अपघात झाला. नवापूर (Navapur) तालुक्यातील निंबोणी गावानजीक वळणावर सोनगीरहून सुरतकडे जाणारा डंपर आणि श्रावणीहून नंदुरबारच्या दिशेने जाणारी जीप यांच्यात हा अपघात (Accident News) झाला. डंपरने धडक दिलेल्या भीषण अपघातात जीपची एक साईड पूर्णता दाबली गेली.

जखमी रूग्णालयात दाखल

अपघातात रागिनी नायकर (वय ४०), शिवकुमार नायकर (वय ४५) व मुलगा हर्षल नायकर (वय १५) सर्व रा. नंदुरबार हे तिघे जखमी झाले आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात खांडबारा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या मार्गावरील हा आठवडाभरातील तिसरा अपघात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT