Bribe Saam tv
महाराष्ट्र

विद्यार्थ्याकडूनही लाच; वस्तीगृहात प्रवेशासाठी मागितले पाच हजार

विद्यार्थ्याकडूनही लाच; वस्तीगृहात प्रवेशासाठी मागितले पाच हजार

दिनू गावित

नंदुरबार : आदिवासी वस्तीगृहात प्रवेशासाठी विद्यार्थ्याकडून पाच हजाराची लाच मागितली. ही लाच घेताना तळोदा प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात रंगेहाथ सापडला. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. (nandurbar news Bribery from students Five thousand asked for admission to the hostel)

आदिवासी वसतीगृहात प्रवेश मिळवून देण्यासाठी लाच स्वीकारतांना तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ लिपिक किशोर भरतसिंग पावरा याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. तळोदा वरिष्ठ महाविद्यालयातील एफवायबीएला शिक्षण घेणाऱ्या तक्रारदार विद्यार्थ्याकडून आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे कनिष्ठ लिपिक किशोर पावरा यांनी वसतिगृहात प्रवेश मिळवून देण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी केली होती.

अर्ज भरूनही यादीत नाव नाही

आदिवासी विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालयामार्फत चालविण्यात येणाऱ्या वस्तीगृहात विनामूल्य राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी तक्रारदार व त्यांच्या मित्राने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा येथे वस्तीगृहात प्रवेश घेण्यासाठी ऑक्टोंबर २०२१ मध्ये ऑनलाईन फॉर्म भरला होता. जानेवारी २०२२ मध्ये होस्टेल प्रवेशासंबंधी यादी लागली. त्यात तक्रारदार व त्याच्या मित्राचे नाव नव्हते.

फोन करत पैशाची मागणी

१७ फेब्रुवारी रोजी लिपिक किशोर पावरा यांचा तक्रारदार यांना फोन आला. त्यांनी वसतीगृहात प्रवेश करून देण्यासाठी पैशांची मागणी केली. तडजोडीअंती पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना प्रकल्प कार्यालयाचे किशोर पावरा यांना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. दरम्यान, या कारवाईमुळे प्रकल्प कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

SCROLL FOR NEXT