Shani Shingnapur Saam tv
महाराष्ट्र

Shani Shingnapur : शनिदेवाला ब्रँडेड तेलाचा अभिषेक; अन्न औषध प्रशासनाकडून विक्रेत्यांकडील तेल तपासणी

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या शनि शिंगणापुर देवस्थानावर भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येत असतात. राज्यातूनच नव्हे तर देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

शनिशिंगणापूरा (अहिल्यानगर) : शनिदेवाच्या शिळेची झीज होत असून शनि देवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी देवस्थान ट्रस्टने ब्रँडेड तेलाचा अभिषेक करण्याचे बंधनकारक केले आहे. १ मार्चपासून नियम लागू करण्यात आला असल्याने त्या अनुषंगाने शनिशिंगणापूरला आता ब्रँडेड तेल तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाने दुकानांची तपासणी सुरु केली आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या शनि शिंगणापुर देवस्थानावर भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येत असतात. राज्यातूनच नव्हे तर देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. शनि देवताला तेल प्रिय असल्याने येणारा प्रत्येक भाविक शनि देवाला तेल चढवत असतो. तसेच काही भक्तगण हे देवाला तेलाचा अभिषेक देखील घालतात. परंतु शनी देवाच्या शिळेची झीज होत असल्याने ब्रँडेड तेलाचाच अभिषेक करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला होता. हा निर्णय १ मार्चपासून समितीने लागू झाला आहे.

देवस्थान कर्मचाऱ्यांकडून होतेय तपासणी 
१ मार्चपासून शनी देवाच्या शिळेची झिज होऊ नये यासाठी ब्रँडेड खाद्य तेल अर्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार देवस्थानकडून कर्मचाऱ्यांमार्फत दर्शन रांगेत भाविकांच्या हातात असलेले तेल तपासण्यास सुरवात करण्यात आली आहे. मात्र तेलाची कंपनी जरी ब्रँडेड असली तरी त्या नावाखाली तेलाची ग्रेड तपासणी अशक्य दिसत असल्याने आता अन्न व औषध प्रशासनाने हि मोहीम हाती घेतली आहे. 

तेलाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत 

या निर्णयामुळे शनी देव मंदिर परिसरातील सर्व दुकानात असलेल्या तीन- चार कंपण्याच्या तेलाचे नमुने तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेत प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन अधिकारी राजेश बडे यांनी दिली आहे. दरम्यान प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर वापरात येणारे तेल ब्रँडेड की भेसळयुक्त आहे हे कळणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT