Vijay Choudhari Saam tv
महाराष्ट्र

Vijay Choudhari News : काँग्रेस नेत्यांची मनस्थिती ढासळली, म्हणून निवडणूक आयोगावर आरोप; भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांचे प्रतिउत्तर

Nandurbar News : भाजपचे महामंत्री विजय चौधरी हे सध्या दौऱ्यावर असून आज नंदुरबार जिल्ह्यात आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत संवाद साधला. यानंतर माध्यमांशी बोलताना विजय चौधरी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि नाना पटोले यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. परंतु काँग्रेसचे नेत्यांची मानसिकता ढासळली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून भाजप आणि निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आरोप केला जात असल्याचे प्रतिउत्तर भाजपाचे महामंत्री विजय चौधरी यांनी काँग्रेसला दिले आहे. 

भाजपचे महामंत्री विजय चौधरी हे सध्या दौऱ्यावर असून आज नंदुरबार जिल्ह्यात आहेत. यावेळी त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत संवाद साधला. यानंतर माध्यमांशी बोलताना विजय चौधरी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला साधत निवडणुकीत होत असलेल्या पराभवावरून होत असलेल्या आरोपांना प्रतिउत्तर दिले आहे. 

जनतेसमोर खोटं मांडायचा एकमेव कार्यक्रम 

लोकसभेत विजय प्राप्त झाला; तर काँग्रेसमुळे आणि विधानसभेत पराभव झाला तर भाजप आणि निवडणूक आयोगावर खापर फोडलं. अशी दुटप्पी भूमिका काँग्रेसची झाली आहे. स्वतःच्या अस्तित्व राहिलं नाही आहे. त्यातच जनतेने देखील नाकारलं असल्याने कुठलाच काम उरलं नाही. त्यामुळे जनतेसमोर खोटं मांडायचं हा एकमेव कार्यक्रम काँग्रेसकडून आणि नाना पटोले कडून केला जात असल्याचा आरोप विजय चौधरी यांनी केला. 

आबू आझमींच्या विधानावर प्रतिक्रिया 

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी वारीमुळे रस्ता जाम होतो; असे वादग्रस्त विधान केले असून या विधानाला भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांनी प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले, कि अबू आझमी जातिवादक धर्मांत व्यक्ती. आमच्या धर्मावर आणि आमच्या रूढी परंपरावर टीका करत आहे. विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी अबू आदमी असे विधान करत आहेत. अबू आझमी आमच्या धर्मावर टीका करत असतील; तर आम्ही सहन करणार नसल्याच्या इशारा विजय चौधरी यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

SCROLL FOR NEXT