Akkalkuwa Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Akkalkuwa Vidhan Sabha : अक्कलकुवा मतदारसंघात हिना गावित उमेदवारीवर ठाम; अपक्ष व भाजपकडूनही भरला अर्ज

Nandurbar News : राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना अजूनही काही ठिकाणी उमेदवारी निश्चित करण्याचा तिढा कायम आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा- अक्राणी या मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र या मतदारसंघात भाजपच्या माजी खासदार हिना गावित या उमेदवारीवर ठाम असून त्यांनी आज अपक्ष अर्ज दाखल करण्यासोबतच भाजपकडून देखील अर्ज दाखल केला आहे. मात्र भाजपच्या उमेदवारी अर्जाला एबी फॉर्म नाही. 

राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना अजूनही काही ठिकाणी उमेदवारी निश्चित करण्याचा तिढा कायम आहे. यात (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा- अक्राणी या मतदारसंघात तिढा आहे. महायुतीत सदरची जागा हि शिवसेना शिंदे गटाला सुटलेली आहे. त्यानुसार याठिकाणी विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी याना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र याठिकाणी भाजपच्या (Hina Gavit) हिना गावित या देखील उमेदवारीसाठी ठाम आहेत. यामुळेच हिना गावितांकडून अक्कलकुवा मतदार संघातून एक अपक्ष व एक भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर वडील मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी नंदूरबारमधून उमेदवारी दाखल केली आहे. 

जागा सुटेल असा विश्वास 

अक्कलकुवा- अक्राणी मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली आहे. विधानपरिषदेचे विद्यमान आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिल्याने विद्यमान आमदार असताना त्यांना उमेदवारी का दिली? असा प्रश्न उपस्थित करत हिना गावित यांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच उद्या उमेदवारी भरण्याची शेवटची मुदत असून उद्यापर्यंत या जागा वाटपात बदल होवून ही जागा भाजपला सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुट्टीच्या दिवशी मंत्रालयाचा कारभार वेगात; रविवारी सरकारने काढले तब्बल 207 जीआर|VIDEO

Maharashtra Live News Update: बैलगाडा शर्यतीत थरार! बैलाची घोडीवरून उडी; मोठा अपघात टळला

New Labour Code: वर्षभरात ग्रॅच्युटी, बेसिक सॅलरी वाढणार; बुधवारपासून नवा कामगार कायदा,वाचा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे

Kuwait attack news: मोठी बातमी! कुवैतमधील वीज प्रकल्प उद्ध्वस्त, भारतीय कामगाराचा मृत्यू

Sun Tan Removal Tips: 3 दिवसात गायब होईल चेहऱ्यावरचं टॅनिंग, हा देसी उपाय नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT