Nandurbar Jail Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Prison Accused Escapes: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी कारागृहातून फुर्रर्र..

Nandurbar Jail News: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी कारागृहातून फुर्रर्र..

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : नंदुरबार येथील जिल्हा कारागृहातील न्यायाधीन बंदिवान कायदेशीर रखवालीतून नजर चुकवून कारागृहातील भिंतीवरून उडी मारून पळून गेला. याबाबत (Nandurbar) नंदुरबार शहर पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला. (Live marathi News)

जिल्हा कारागृह नंदुरबार येथील सर्कल क्रमांक १ ते ८ मधील कारागृहाच्या आतील साचलेला कचरा बाहेर टाकण्यासाठी बंद्यांना होमगार्ड रवींद्र चव्हाण याच्यासोबत पाठविण्यात आले होते. रविवारी (ता. १७) सकाळी सहा ते सातच्या दरम्यान हे काम सुरू होते. त्याच वेळी तळोदा पोलिस ठाण्यांतर्गत खुनाच्या गुन्ह्यातील न्यायाधीन बंदिवान उदेसिंग कुशा बसावे (रा. तळोदा, ता. जि. नंदुरबार) याने संधी साधली.

संरक्षक भिंतीवरून मारली उडी

उदेसिंग बसावे हा जिल्हा कारागृहाच्या महिला विभागाच्या मागील बाजूने पळाला व तेथील बाजूने मेन गेटजवळील मुलाखत कक्षाच्या बाजूला असलेल्या बोळीत पळून संरक्षक भिंतीवरून उडी मारत पळून गेला. याबाबत अधिकारी संदीप चव्हाण यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Maharashtra News Live Update: चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; युवती जखमी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

Thumb sucking in children: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय कशी मोडाल?

SCROLL FOR NEXT