Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Navapur : आश्रम शाळेतील सहा वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू; नवापूर तालुक्यातील घटनेने खळबळ

Nandurbar News : आश्रम शाळेतील विद्यार्थी आयान हा बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास लघुशंका करण्यासाठी शौचालयात गेला असता तो अचानक खाली पडला असून यातच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील खडकी आश्रम शाळेत एका सहा वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यूने तालुक्यात खडबड उडाली असून चिमुकल्याचा मृत्यूने खांडबारा ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला आहे. दरम्यान आश्रम शाळेत पाहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यूचे कारण मात्र अस्पष्ट आहे. 

नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खडकी येथील आश्रम शाळेतील आयान अंकेश गावित (वय ६) असे मृत झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. दरम्यान खडकी आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांची निवासी शाळा असून या मुलांना येथेच राहण्याची व्यवस्था आहे. तर सहा वर्षीय विद्यार्थी आयान हा बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास लघुशंका करण्यासाठी शौचालयात गेला होता. याच ठिकाणी तो खाली पडला होता. 

रुग्णालयात नेले मात्र 

दरम्यान आयान हा खाली पाडल्यानंतर त्याची तब्येत खराब झाल्याची माहिती आश्रम शाळेतील अधीक्षक यांना मिळाली. त्यांनी लागलीच या विद्यार्थाला खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी विद्यार्थ्याला मृत्यु घोषित केले अशी माहिती शासकीय आश्रम शाळा खडकी येथील अधीक्षक अरविंद पवार यांनी दिली आहे. 

नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश 
दरम्यान आश्रम शाळेतील या सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मुलाच्या मृत्यूच्या घटनेची माहिती कुटुंबियांना मिळाल्यानंतर रुग्णालयात धाव घेत एकच आक्रोश केला. तर घटनेची सखोल चौकशी प्रशासनाने करावी आणि दोषी आढळल्यास दोशींवर कठोर कारवाई करण्यात यावी; अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Crime : खराब नारळ का दिलं? ग्राहकाने जाब विचारल्याने विक्रेता भडकला; चाकू हल्ल्यात ग्राहकाची करंगळी तुटली

ममता कुलकर्णीचं दाऊद प्रेम उफाळलं, साध्वी ममतासाठी दाऊदही साधू

आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा फॉर्म्युला, कडूंचा फॉर्म्युला सरकार मान्य करणार?

SCROLL FOR NEXT