Nandurbar News Child Marriage Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: अवघ्या दोन महिन्यात रोखले ११ बालविवाह; ऑपरेशन अक्षताचे यश

अवघ्या दोन महिन्यात रोखले ११ बालविवाह; ऑपरेशन अक्षताचे यश

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्‍ह्यात होत असलेले बालविवाह रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून ऑपरेशन अक्षता ही मोहिम राबविली जात आहे. या अंतर्गत (Nandurbar) जिल्‍ह्यात मागील दोन महिन्‍याच्‍या कालावधीत तब्‍बल ११ बालविवाह (Child Marriage) रोखण्यात यश आले आहे. (Maharashtra News)

बालविवाहांना प्रतिबंध करणे तसेच महिलांविषयक कौटुंबिक हिंसाचार आणि अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाययोजना करणे या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन अक्षता हा महत्वाकांक्षी उपक्रम यावर्षी 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु करण्यात आला होता. बालविवाह रोखणे ही प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी असून आपल्या परिसरात होवू घातलेल्या प्रत्येक बाल विवाहाबाबत नजिकच्या अक्षता समिती, बीट अंमलदार तसेच पोलीस (Police) ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचीत करावे असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी ऑपरेशन अक्षताच्या शुभारंभ प्रसंगी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले होते.

ऑपरेशन अक्षताचा जिल्‍ह्यात चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असून अवघ्या दोन महिन्यातच जिल्हा पोलीस दलाला ११ बालविवाह रोखण्यात यश आले आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अक्षता अंतर्गत नंदुरबार पोलीसांनी मागील दोन दिवसात दुसरा बालविवाह रोखल्याने नंदुरबार पोलीसांचे सर्वत्र कौतूक होत आहे. तसेच ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यानंतर देखील नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील बालविवाहाच्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यात यश येईल तसेच आज पावेतो नंदुरबार जिल्ह्यातील ६३४ ग्रामपंचायतींपैकी ६१५ ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह विरोधी ठराव घेण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बालविवाह रोखण्यात मोठे यश जिल्हा पोलीस दलाला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आज पुणे स्टेशनवरून एकही लोकल सुटणार नाही

३२ वर्षीय बायकोचे शिक्षकासोबत अफेअर; ४५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं, नागपुरातील धक्कादायक घटना

Gayatri Datar Mangalsutra Design: शिव-शक्तीचं प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं! गायत्री दातारच्या 'दोन वाट्यांच्या' मंगळसूत्राने वेधलं लक्ष

PM Modi Plays Football: प्रचार थांबताच पंतप्रधान मोदी सिक्कीममध्ये, मुलांसोबत खेळले फुटबॉल, पाहा फोटो

BOB Recruitment: कोणतीही परीक्षा नाही, थेट बँक ऑफ बडोदात नोकरी; भरघोस पगार मिळणार; अर्ज कधीपर्यंत करता येणार? वाचा

SCROLL FOR NEXT