sharad gavit girish naik, Navapur Vidhan Sabha Exit Poll 2024: नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर विधानसभेत तिरंगी लढत झाली. काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या उमेदवाराला भरत गावित यांच्यासह अपक्ष उमेदवार शरद गावित यांचे आव्हान होतं. यामुळे या विधानसभेत काँग्रेस आपला गड राखेल का? याकडे नंदुरबारचे लक्ष लागले होते. पण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार अपक्ष उमेदवाराचे पारडे जड दिसत आहे.
नवापूरमध्ये तिरंगी लढतीत अपक्ष उमेदवार विजय मिळण्याची शक्यता आहे. नवापूरमध्ये अपक्षाने मविआ आणि महायुतीला जोरदार धक्का दिलाय. नवापूरमध्ये अपक्ष शरद गावित विजयी होण्याची शक्यता आहे. नवापूरमध्ये काँग्रेसकडून गिरीष नाईक मैदानात होते. पण या मतदारसंघात काँग्रेसला जोरदार धक्का बसल्याचे दिसते आहे .
तिरंगी लढतीत विजयकुमार गावित यांचे बंधू शरद गावित विजयी होण्याची शक्यता आहे. महायुती आणि मविआला जोरदार धक्का बसलाय. नवापूरमध्ये काँग्रेसची मोठी ताकद आहे, पण अपक्ष निवडणूक येत असल्याचे दिसत आहे.
शरद गावित हे २००९ मध्ये नवापूरमधून आमदार झाले होते. तेव्हापासूनच शरद गावित या मतदारंसघात अपक्ष उमेदवारी करत आहेत. भरत गावित आणि शरद गावित यांची उमेदवारी काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक यांची डोकेदुखी वाढली. मतदार नेमका कोणाच्या बाजूने कौल देईल; हे २३ तारखेला स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.